नवी दिल्ली, 16 डिसेंबर: अॅपलची (Apple) कंपनीने 1 फेब्रुवारी 2022 पासून कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील असे कंपनीने यापूर्वी सांगितले होते. मात्र, कोरोनाचे (Covid-19) नवीन प्रकार ओमिक्रॉन (Omicron)चे वाढते प्रकरण लक्षात घेऊन कंपनीने निर्णय मागे घेतला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळासाठी घरून काम करण्याची (WFH) परवानगी दिली आहे. कार्यालय उघडण्याच्या तारखा पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. हे कार्यालय पुन्हा केव्हा सुरू होईल, याबाबत सध्यातरी सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, कंपनीने घरून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एक हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 75 हजार डॉलर्सचा बोनसही जाहीर केला आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कंपनीने या आठवड्यात त्यांचे स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कंपनी लोकांना वारंवार आवाहन करत आहे की त्यांनी मास्कशिवाय त्यांच्या दुकानात येऊ नये. सीईओ टीम कुक यांनी कंपनी न उघडण्याच्या आदेशाबाबत ई-मेलही केला आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहनही केले आहे. टीम कुकने आपल्या इमेलमध्ये कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 1000 डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. कुकच्या म्हणण्यानुसार, घरून काम करणारे कर्मचारी त्यांच्या गरजेनुसार या पैशातून सामन खरेदी करु शकतील. कुकच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
कसे असणार आहे कामाचे नियोजन?
Apple कर्मचारी कार्यालयात परतल्यावर, त्यांनी सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी वैयक्तिकरित्या काम करणे अपेक्षित आहे. त्यांना त्यांच्या टीमनुसार बुधवार आणि शुक्रवारी घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. कंपनी घरून काम करण्यासाठी एक महिना अतिरिक्त वेळ देईल. तसेच, कार्यालय सुरू होण्याच्या चार आठवड्यांपूर्वी कर्मचाऱ्यांना मेल पाठवला जाईल.

)







