लखनऊ, 16 जून: मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची सून (Daughter-in-law) अपर्णा यादव (Aparna Yadav) यांना जीवे मारण्याच्या (Death Threats) धमक्या आल्या आहेत. धमकीची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बुधवारी संध्याकाळी 4.11 वाजता अपर्णा यादव यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. हा कॉल अपर्णा यांनी उचलला नाही. दुसऱ्याच क्षणी त्याच नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. व्हॉट्सअॅप कॉलरने अपर्णा यांना 72 तासांत एके-47 देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. कॉलरने या धमकीला गांभीर्यानं घ्या आणि त्याची नोंद घेण्यास सांगितलं आणि अपशब्द वापरून कॉल ठेवून दिला. भीषण अपघात..! वऱ्हाडींनी भरलेली गाडी पडली खड्ड्यात, 7 जणांचा मृत्यू या धमकीवरून अपर्णा यांचे सरकारी पीएसओ दिलीप सिंह यांनी गौतमपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आयपीसी 504, 506, 508 मध्ये गौतमपल्ली पोलीस ठाण्यात धमकी दिलेल्या क्रमांकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. डीसीपी सेंट्रल अपर्णा गौतम यांनी सांगितलं की, एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या क्रमांकावरुन धमकी देण्यात आली त्याचा तपशील काढला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अपर्णा या मुलायम सिंह यांच्या सून आहेत अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यांच्या पत्नी आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अपर्णा यादव या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. अपर्णा यादव यांना गौ सेविका म्हणून ओळखले जाते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अपर्णा यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतही अनेकदा अखिलेश यादव यांना प्रश्न विचारले जातात, मात्र अखिलेश यांनी अशा प्रश्नांना कधीही उत्तर दिले नाही. अपर्णा ही मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना यादव यांचा मुलगा प्रतीक यांची पत्नी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.