मराठी बातम्या /बातम्या /देश /मुंबईसारखं आणखी एक Blackout, 'या' राज्यावर चिनी हॅकर्सची नजर

मुंबईसारखं आणखी एक Blackout, 'या' राज्यावर चिनी हॅकर्सची नजर

मुंबईमध्ये (Mumbai) गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ब्लॅकआऊटमध्ये (Mumbai Blackout) चीनी हॅकर्सचा कट असल्याची बातमी उघड झाली होती. त्यापाठोपाठ आता तेलंगणा (Telangana) राज्यातही ब्लॅकआऊट करण्याचा प्रयत्न झाला आहे.

हैदराबाद, 3 मार्च : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये (Mumbai) मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ब्लॅकआऊटमध्ये (Mumbai Blackout) चीनी हॅकर्सचा कट असल्याची बातमी उघड झाली होती. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्राच्या शेजारच्या तेलंगणा (Telangana) राज्यातही ब्लॅकआऊट करण्याचा प्रयत्न झाला आहे.

‘कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’ च्या दक्षतेमुळे हॅकर्सचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. चिनी हॅकर्सनी (Chinese Hackers) तेलंगणातील टीएस ट्रांस्को (TS Transco) आणि टीएस गेनको (TS Genco) या दोन पॉवर सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न केल्या. या दोन्ही तेलंगणातील प्रमुख पॉवर युटिलिटी यंत्रणा आहेत.

काय होता प्रयत्न?

चिनी हॅकर्सचा या केंद्रावरील डेटा चोरण्याचा कट होता. गेनकोला या धोक्याची जाणीव होताच त्यांनी संशयित आयपी अ‍ॅड्रेस ब्लॉक केला. त्याचबरोबर बाहेरच्या गावी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पॉवर ग्रिड युझर डेटा बदलला. देशातील कमीत कमी 12 सरकारी संस्था या हॅकर्सचं टार्गेट असल्याचा दावा नुकत्यात प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पॉवर युटिलिटी आणि त्यासंबंधी काम करणाऱ्या सेंटर्सचा समावेश आहे.

'रेकॉर्डेड फ्युचर' या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनटीपीसी लिमिटेड, पाच विभागीय वितरण सेंटर आणि दोन बंदरांवर या हॅकर्सनी यापूर्वी हल्ला केला होता, अशी माहिती या संस्थेनं दिली आहे.  वीज क्षेत्रातील एका मोठ्या संस्थेला टार्गेट करण्यासाठी चिनी हॅकर्सनी एका विशेष सॉफ्टवेयरचा वापर केला,’ असे या संस्थेच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

(हे वाचा : मुंबईतील 'ब्लॅक आऊट'बाबत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान )

चिनी हॅकर्सचा हा सर्व उद्योग हा सरकारी पाठबळामुळेच सुरु आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या हॅकर्सच्या संघटना चीनची सुरक्षा एजन्सी, गुप्तचर संघटना आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) यांच्याशी संबंधित आहेत. भारतामधील वीज विभागासह संरक्षण आणि अनेक सरकारी विभाग यांचं टार्गेट आहेत, असा इशारा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Cyber crime, Hacking, India, India china, Mumbai, Telangana