मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील 'ब्लॅक आऊट'बाबत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान; ठाकरे सरकारकडून मागवणार रिपोर्ट

मुंबईतील 'ब्लॅक आऊट'बाबत केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान; ठाकरे सरकारकडून मागवणार रिपोर्ट

मुंबईत 13 ऑक्टोबर 2020 मध्ये दोन तास वीज पुरवठा खंडित (Mumbai Black out) झाला होता.

मुंबईत 13 ऑक्टोबर 2020 मध्ये दोन तास वीज पुरवठा खंडित (Mumbai Black out) झाला होता.

मुंबईत 13 ऑक्टोबर 2020 मध्ये दोन तास वीज पुरवठा खंडित (Mumbai Black out) झाला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 1 मार्च : मुंबईत 13 ऑक्टोबर 2020 मध्ये दोन तास वीज पुरवठा खंडित (Mumbai Black out) झाला होता. यामुळे मुंबईतील जीवनवाहिनी लोकदेखील काही काळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय शेअर मार्केवरही याचा परिणाम झाला होता. दरम्यान एका रिपोर्टनुसार यामागे चिनी कनेक्शन (Chinese connection) असल्याचं समोर आलं आहे. मात्र केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. (Big statement of Union Energy Minister regarding Black Out in Mumbai)

या प्रकरणात केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह म्हणाले की, महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्र्यांकडून मुंबईत वीज खंडित झाल्याशी संबंधित सायबर हल्ल्यावर रिपोर्ट मागविण्यात येणार आहे. खरंच यामागे चिनी कनेक्शन वा सायबर हल्ला होता का, याचाही तपास करण्यात येईल. आरके सिंह पुढे म्हणाले की, मुंबईत गेल्या वर्षी मानवीय चुकीमुळे वीज खंडित झाली होती. यामागे सायबर हल्ला नव्हता.

हे ही वाचा-आपला तो बाब्या, पूजा चव्हाणसह प्रलंबित प्रकरणांवरुन भाजपचा गृहमंत्र्यांवर निशाणा

देशातील वीज पुरवठा (Power Supply) खंडित करण्याचा कट चीनी हॅकर्सनं (Chinese Hackers) आखला आहे. मुंबईमध्ये मागच्या वर्षी झालेलं ‘ब्लॅक आऊट’ हा या व्यापक कटाचा भाग होता, अशी माहिती एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. कमीत कमी 12 सरकारी संस्था या हॅकर्सचं टार्गेट असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पॉवर युटिलिटी आणि त्यासंबंधी काम करणाऱ्या सेंटर्सचा समावेश आहे.

First published:

Tags: Mumbai, Nitin raut