Home /News /national /

आता प्राण्यांनाही मिळणार कोरोनाची लस, भारतात लाँच झाली Anocovax

आता प्राण्यांनाही मिळणार कोरोनाची लस, भारतात लाँच झाली Anocovax

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) एका निवेदनात म्हटलं आहे की, अ‍ॅनोकोव्हॅक्स ही प्राण्यांसाठी सार्स-कोव्ह-2 डेल्टा (SARS-CoV-2 Delta) लस आहे. सार्स कोव्हच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांपासून संरक्षण करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली 10 जून : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी गुरुवारी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली अँटी-कोविड लस 'अ‍ॅनोकोव्हॅक्स' (Enokovax) लाँच केली. ही लस आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने (NRC) विकसित केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) एका निवेदनात म्हटलं आहे की, अ‍ॅनोकोव्हॅक्स ही प्राण्यांसाठी सार्स-कोव्ह-2 डेल्टा (SARS-CoV-2 Delta) लस आहे. सार्स कोव्हच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांपासून संरक्षण करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे. या लसीमध्ये निष्क्रिय सार्स कोव्ह 2 (डेल्टा) अँटिजेन आणि अलहायड्रोजेलचा (Alhydrogel) समावेश आहे. ही लस कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ, चौथी लाट येणार का? वाचा महत्त्वाचे अपडेट्स आयसीएआर-एनआरसीद्वारे प्राण्यांसाठी विकसित केलेली लस आणि डायग्नोस्टिक किट्सना तोमर यांनी डिजीटल पद्धतीने रिलीज केलं. त्यानंतर तोमर म्हणाले, "शास्त्रज्ञांच्या अथक योगदानामुळे, लसी आयात करण्याऐवजी स्वदेशी लसी विकसित करण्यात आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. हे खरोखरच मोठं यश आहे." आयसीएआर ही देशातील प्रमुख कृषी संशोधन संस्था आहे, जी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इक्वीन डीएनए पॅरेंटेज टेस्टिंग किटदेखील केंद्रीय मंत्री तोमर यांनी लाँच केले आहे. ही किट म्हणजे, घोड्यांमधील पालकत्व विश्लेषणासाठी तयार करण्यात आलेलं एक शक्तिशाली जीनोमिक तंत्र आहे. या कार्यक्रमादरम्यान आयसीएआरचे महासंचालक (Director General of ICAR) त्रिलोचन महापात्रा, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव अतुल चतुर्वेदी आणि आयसीएआर उपमहासंचालक भूपेंद्र नाथ त्रिपाठी उपस्थित होते. MP News : भुंकणाऱ्या कुत्र्याला हाकललं, कुत्र्याच्या मालकाने उचललं धक्कादायक पाऊल केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून कार्यक्रमाची माहिती दिली. 'भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत हरियाणातील हिस्सार येथील राष्ट्रीय घोडे संशोधन केंद्राने (National Horse Research Center) विकसित केलेल्या चार तंत्रज्ञान पद्धती आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पशुधनाचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठीच्या लसींचा समावेश आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. माणसांसाठी लस विकसित केल्यानंतर प्राण्यासांठीही भारतीय शास्त्रज्ञांनी लस विकसित केली आहे हे मोठे यश आहे. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश आपली भारतीय संस्कृती देते. या स्वदेशी लसींमुळे या प्राण्यांचा जीव वाचवणंही शक्य होणार आहे. देशातील पाळीव प्राण्यांच्या मालकांनी आपल्या प्राण्यांना ही स्वदेशी लस द्यायला हवी जेणेकरून ते प्राणी सुरक्षित होती आणि त्यांच्यापासून कोविडचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होईल.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या