जाहिरात
मराठी बातम्या / देश / Anju Nasrullah Love Story : अंजूचा नवरा आणि शेजारी पहिल्यांदाच आले समोर, धक्कादायक मागणी

Anju Nasrullah Love Story : अंजूचा नवरा आणि शेजारी पहिल्यांदाच आले समोर, धक्कादायक मागणी

अंजू

अंजू

अंजूने पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारून निकाह केला, अशी बातमी समोर आली.

  • -MIN READ Local18 Alwar,Rajasthan
  • Last Updated :

पीयूष पाठक, प्रतिनिधी अलवर, 27 जुलै : फेसबुकवरून मैत्री झाल्यावर प्रियकराला भेटण्यासाठी राजस्थानची अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वात गेली. यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, यानंतर आता पाकिस्तानात पोहोचलेली अंजू आता तिच्या कुटुंबासाठीही खलनायक बनली आहे. काही काळापर्यंत जी मुले अंजूला आई म्हणून हाक मारायची, आता त्याच मुलांना तिचा चेहराही पाहायचा नाहीए. तसेच तिचा पती अरविंदसुद्धा तिचा स्विकार करायला तयार नाही आहे. अंजूचे वडील आधीच तिला ती मानसिक तणावात असल्याचे बोलले आहेत. तर अंजूचा नवरा आणि मुलं आता एका अनोळखी ठिकाणी राहायला गेली आहेत. तिचा पती अरविंद याने माध्यमांना सांगितले की, जर अंजू भारतात परतली तर तिला तो स्विकारणार नाही. तसेच अंजूच्या या वागण्याने तिचे शेजारीही संतप्त झाले आहेत. तिला परत येण्याची काहीच गरज नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अंजूने पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारून निकाह केला, अशी बातमी समोर आली. यानंतर आता अंजूने एक व्हिडिओ जारी केला. यामुळे अंजू लवकरच भारतात परण्यावरुन आणि तिने एका पाकिस्तानी तरुणासोबत लग्न केल्याच्या या बातमीत काय सत्य आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. अंजूने धर्मांतर केल्याची बातमी समोर आल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. अंजूनच्या या निर्णयानंतर भिवडीमध्ये काही संघटनांनी निदर्शनेही केली आहेत. अशा महिलांना भारतात परतण्याची गरज नाही, असे या आंदोलनकांनी म्हटले आहे. शेजाऱ्यांमध्येही संताप - अंजू भिवाडीमध्ये शोभिवंत सोसायटीत राहत होती. मात्र, आता अंजू ही पाकिस्तानात गेल्याबद्दल या सोसायटीमधील लोकांमध्ये संताप आहे. अंजू तिच्या कुटुंबाला न सांगता आणि मुलांना एकटी सोडून पाकिस्तानला गेली, त्यामुळे तिच्याबाबत सोसायटीच्या लोकांनाही राग आला आहे. तसेच अंजू भारतात परतली तर तिला या सोसायटीत राहू दिले जाणार नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात