नवी दिल्ली, 8 एप्रिल : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर अनिल देशमुख यांचं राजकीय भवितव्य ठरण्याची शक्यता असल्याने सुप्रीम कोर्टात नेमकं काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयची चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख यांनी व्यक्तिगत स्तरावर सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे.
परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी महाराष्ट्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - ...तर शिवसेना पक्षप्रमुख मला फासावर लटकवतील, अनिल परब संतापले
दरम्यान, मुंबई हाय कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतरच अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण राजीनामा देत असल्याचं त्यावेळी देशमुख यांनी सांगितलं होतं.
सचिन वाझेने घेतलं आणखी एका मंत्र्याचं नाव
सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचं नाव आल्याने खळबळ उडाली आहे. NIA कोर्टात सचिन वाझे याने एक पत्र दिलं असून यामध्ये शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर वसुलीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. मात्र अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Supreme court