मराठी बातम्या /बातम्या /देश /व्यापाऱ्याला धक्का; तिजोरीत ठेवलेल्या 5 लाखांच्या नोटा वाळवीने खाल्ल्या, वाचा नेमकं झालं काय?

व्यापाऱ्याला धक्का; तिजोरीत ठेवलेल्या 5 लाखांच्या नोटा वाळवीने खाल्ल्या, वाचा नेमकं झालं काय?

एखाद्या किडीने नोटा खाल्ल्याची घटना तशी दुर्मिळ म्हणावी लागेल. अशी घटना नुकतीच उघडकीस आली असून, संबंधित व्यक्तीचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे.

एखाद्या किडीने नोटा खाल्ल्याची घटना तशी दुर्मिळ म्हणावी लागेल. अशी घटना नुकतीच उघडकीस आली असून, संबंधित व्यक्तीचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे.

एखाद्या किडीने नोटा खाल्ल्याची घटना तशी दुर्मिळ म्हणावी लागेल. अशी घटना नुकतीच उघडकीस आली असून, संबंधित व्यक्तीचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे.

 आंध्रप्रदेश, 18 फेब्रुवारी : अडीअडचणीला, गरजेवेळी खर्च करण्यासाठी आपण घरामध्ये काही रक्कम ठेवत असतो. काहींचं बॅंकेत खातं नसेल तर ते देखील रक्कम घरातच ठेवण्याला प्राधान्य देतात. आता डिजिटलायझेशनमुळे अर्थिक व्यवहार करणं सोपं झालं असलं, तरी अनेक जण रोख व्यवहाराला प्राधान्य देतात. यासाठी काही रक्कम ते जवळ बाळगतात. घरामध्ये रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वसाधरणपणे कपाटामधील किंवा एखाद्या स्वतंत्र तिजोरीचा वापर केला जातो.

ही कपाटं लाकडी किंवा लोखंडाची असतात. तर तिजोऱ्या देखील विशेष धातूंनी बनवलेल्या असतात. त्यामुळे रक्कम सर्वार्थाने सुरक्षित राहण्यास मदत होते. असे असतानाही चोरीच्या घटना अनेकदा घडताना दिसतात. यात नवीन काय असं वाटेल. परंतु, एखाद्या किडीने नोटा खाल्ल्याची घटना तशी दुर्मिळ म्हणावी लागेल. अशी घटना नुकतीच उघडकीस आली असून, संबंधित व्यक्तीचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे.

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका वराहपालन (Pig-rearer) करणाऱ्या व्यापाऱ्याने लोखंडी पेटीत नोटा (Currency) सुरक्षित ठेवल्या होत्या. भविष्यातील काही योजनांसाठी त्याने ही बचत केली होती. मात्र लोखंडी पेटीत ठेवलेल्या या नोटांना वाळवी (Termite) लागली आणि वाळवीने या सर्व नोटा खाऊन टाकल्या. हा प्रकार पाहून त्या व्यापाऱ्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

(वाचा - घोड्यामुळे नवरदेवाला पळता भुई झाली थोडी, लग्नादिवशीच जखमी झाला तरुण; पाहा VIDEO)

द हिंदूच्या वृत्तानुसार, मैलावरम (Mylavaram) गावातील बी. जमालैय्या यांनी 5 लाख रुपयांची रक्कम एका लोखंडी पेटीत ठेवली होती. मंगळवारी जेव्हा त्यांनी ही पेटी उघडली तेव्हा त्यातील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. वाळवीने 5 लाख रुपयांच्या नोट्या फस्त केल्या होत्या. मोठं अर्थिक नुकसान झाल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना रडू कोसळलं आणि ते मदतीसाठी याचना करू लागले. या प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

मला नवं घर बांधायचं होतं. त्यासाठी मी बचत केली होती. परंतु, सर्व नोटांवर पडलेली छिद्र पाहून मी अस्वस्थ झाल्याचं जमालैय्या यांनी सांगितलं. जमालैय्या यांचे कोणत्याही बॅंकेत बचत खातं नाही. त्यामुळे त्यांनी लोखंडी पेटीत पैसे साठवले होते, असं ग्रामस्थांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Andhra pradesh