जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनावर ज्या आयुर्वेदिक औषधासाठी लागल्या होत्या रांगा; ते औषध घेणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू

कोरोनावर ज्या आयुर्वेदिक औषधासाठी लागल्या होत्या रांगा; ते औषध घेणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू

कोरोनावर ज्या आयुर्वेदिक औषधासाठी लागल्या होत्या रांगा; ते औषध घेणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू

आयुर्वेदिक औषधाने आपण कोरोनातून बरं झाल्याचा दावा या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 31 मे :  कोरोनावर (Corona medicine) वेगवेगळी औषधं येत आहेत, काही औषधांचे प्रयोग सुरू आहेत. याचदरम्यान सोशल मीडियावर कोरोनातून बरं होण्यासाठी विचित्र उपाय किंवा औषधं (Corona drug) सांगितली जात आहेत. अनेक दावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच एका आयुर्वेदिक औषधाने (Corona ayurvedic drug) कोरोना बरा झाला असा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर हे औषध घेण्यासाठी एकच गर्दी जमली. दरम्यान हा दावा करणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशच्या (Andhra pradesh) नेल्लूरमधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन केटैया यांनी आपण चमत्कारिक असं आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर कोरोनातून बरं झाल्याचा दावा केला होता. जीजीएच नेल्लोरमध्ये त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला आहे. हे वाचा -  Corona : मृतांच्या आकड्याचा दिलासा, सोमवारी झाले 184 मृत्यू तर 15 हजार नवे रुग्ण काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोना झाला तेव्हा त्यांनी आयुर्वेदिक औषध घेतलं आणि आपण बरे झालो असा दावा केला होता. त्यांचा हा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.  कौटेया यांनी नेल्लूरच्या कृष्णापट्टनमच्या बोहिनी आनंदय्या यांच्यामार्फत तयार करण्यात आलेलं हर्बल आय ड्रॉप घेतलं होतं. त्यानंतर ते कोरोनातून बरे झाले, असं त्यांनी सांगितलं. हे औषध घेण्यासाठी कृष्णापट्टनम गावातील कित्येक लोकांनी रांगा लावल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. हे वाचा -  शंभरी पार आजीआजोबांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा; घरीच उपचार घेऊन हरवलं व्हायरसला एन कौटेया यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. शुक्रवारी रात्री त्यांना नेल्लोरच्या सरकारी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  कौटेया यांना इतर अनेक आजार होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे, असं जीजीएच, नेल्लूरचे अधीक्षक डॉ. सुधाकर रेड्डी यांनी मीडियाशी बोलताना सांगितल्याचं वृत्त वन इंडिया ने दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात