जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, आई-वडिलांनी मुलांसह संपवला जीव

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, आई-वडिलांनी मुलांसह संपवला जीव

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, आई-वडिलांनी मुलांसह संपवला जीव

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) भीतीने एका संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 23 जून: कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) गेल्या दोन वर्षात संपूर्ण जग बदलून गेलं आहे. कोरोनाचा रुग्ण सापडला नाही, असा जगात एकही देश नाही. मानवी जीवनाचे प्रत्येक क्षेत्र कोरोनाने प्रभावित झाले आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशभर मोठा फटका बसला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्याचबरोबर कोरोनाचा मानसिक स्थैर्यावर (mental stability) मोठा परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने एका संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्वांना हादरवून सोडणारी ही घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कर्नुल शहरातील आहे. या शहरातील वड्डेनगरी भागातील चार जणांच्या कुटुंबाने विष (poison)  प्राशन करत आत्महत्या (Suicide) केली. या कुटुंबाची ओळख पटली असून प्रताप (वय - 42), हेमलता (36),  जयंत (17) आणि रिशिता (14) अशी त्यांची नावं आहेत. यामध्ये प्रताप हा टीव्ही मेकॅनिक होता. जयंत एक कोर्स करत होता. तर रिशिता सातवीमध्ये शिकत होती. कसा झाला खुलासा? बुधवारी सकाळी घरातील कोणताही सदस्य बाहेर दिसला नाही. तसेच घराचा दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे शेजारच्यांना संशय आला. त्यांनी दार वाजवल्यानंतरही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिथे त्यांना चौघांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरुन सुसाईड नोट (Suicide note) जप्त केली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण कोरोनाची भीती असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या मित्राचा आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची भीती सतावत होती. या भीतीमधूनच या संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले. मधुचंद्राच्या रात्रीच नवविवाहित जोडप्यानं केला विष पिऊनआत्महत्येचा प्रयत्न आंध्र प्रदेशमध्ये आत्तापर्यंत 18, 54457 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 53880 ही अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे. तर राज्यात  12,416 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात