Home /News /national /

अशा पद्धतीनं भारतातही होऊ शकते वीजनिर्मिती, Video शेअर करत आनंद महिंद्रांनी गडकरींना सुचवलं

अशा पद्धतीनं भारतातही होऊ शकते वीजनिर्मिती, Video शेअर करत आनंद महिंद्रांनी गडकरींना सुचवलं

Electricity from road traffic: आनंद महिंद्रा यांनी एका तंत्रज्ञानाविषयी गडकरींना उद्देशून ट्विट केलंय. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टर्बाइनचा (wind power turbine) वापर करून वीज निर्माण केली जाते. रहदारी येताच, चालणाऱ्या वाहनांमुळे येणारा हवेचा झोत टर्बाइन फिरवतो, याचं टर्बाइन विजेत रूपांतर करतं.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 7 एप्रिल : उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) अनेकदा सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह असतात. ते नेहमीच तरुण पिढी आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टींना प्रेरणा देत असतात. देशात सुरू असलेल्या चांगल्या कामाचंही ते कौतुक करतात. नुकतीच आनंद महिंद्रा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari) यांना एक सूचना केली आहे. आनंद महिंद्रा यांनी एका तंत्रज्ञानाविषयी गडकरींना उद्देशून ट्विट केलंय. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टर्बाइनचा (wind power turbine) वापर करून वीज निर्माण केली जाते. रहदारी येताच, चालणाऱ्या वाहनांमुळे येणारा हवेचा झोत टर्बाइन फिरवतो, याचं टर्बाइन विजेत रूपांतर करतं. हे तंत्रज्ञान तुर्कीमधील इस्तंबूल टेक्निकल युनिव्हर्सिटीनं (Istanbul Technical University) विकसित केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींना सल्ला दिला आहे की, हे तंत्रज्ञान स्वदेशी तत्त्वावर विकसित करून आपण आपल्या देशाच्या वाहतुकीतून पुरेशी वीज निर्माण करू शकतो. यातून पवन ऊर्जा ही जागतिक शक्ती बनेल.. स्वदेशीबद्दल बोलताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलंय की, "भारतातील सध्याची वाहतूक परिस्थिती लक्षात घेता, जर आपण हे तंत्रज्ञान आपल्या देशात लागू केलं, तर आपण पवन ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक शक्ती बनू शकतो." नितीन गडकरींना सल्ला देताना त्यांनी लिहिलंय आहे की, हे तंत्रज्ञान आपण महामार्गावर वापरू शकतो का? आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये असं दिसून येतं की जशी वाहतूक रस्त्यावरून पुढे सरकत आहे, तशीच टर्बाईनही फिरत जाते. व्हिडिओमध्ये असंही दिसत आहे की, ही टर्बाइन CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइडचं मापन देखील सांगते. म्हणजेच तेथील वातावरणातील प्रदूषणाची पातळी काय आहे, हेही सांगते. एका तासात इतकी किलो वॅट वीज ही टर्बाइन एका तासात 1 किलोवॅट वीज तयार करते. आनंद महिंद्राच्या या ट्विटनंतर युजरनं या तंत्रज्ञानाला आश्चर्यकारक म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. काही युजर्सनी हे अप्रतिम असल्याचं सांगितलंय. एका यूजरनं लिहिले की, सर, आमच्याकडे कशाचीही कमतरता नाही. सर्व काही पुरेशा प्रमाणात आहे. सौरऊर्जा असो, वारा असो, जलविद्युत असो वा भरती-ओहोटी, सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात असतात. या गोष्टींपासून वीजनिर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हे वाचा - चोरानं मंदिरातले दागिने चोरण्यासाठी खिडकी फोडली, पण नंतर मिळाली अशी काही शिक्षा की..
   हे टर्बाइन हळू ट्रॅफिकमध्ये फिरेल का?
  एका यूजरनं लिहिलंय की, सर, आपण हे तंत्रज्ञान फक्त रस्त्यांपुरतं मर्यादित ठेवू नये. तर, इतर ठिकाणीही त्याचा वापर केला पाहिजे. हे तंत्रज्ञान आल्यावर मेट्रोच्या मार्गावरही त्याचा वापर करता येईल. मात्र, जिथं वाहतूक अतिशय संथ आहे, तिथं हे तंत्रज्ञान चालणार नाही, अशी शंका एका वापरकर्त्यानं व्यक्त केली आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Anand mahindra, Electricity, Nitin gadkari

  पुढील बातम्या