जाहिरात
मराठी बातम्या / देश / उत्तराखंडनंतर कर्नाटकात नाराजीनाट्य, भाजपमधील अंतर्गत वादात मुख्यमंत्री बदलाचे वारे!

उत्तराखंडनंतर कर्नाटकात नाराजीनाट्य, भाजपमधील अंतर्गत वादात मुख्यमंत्री बदलाचे वारे!

उत्तराखंडनंतर कर्नाटकात नाराजीनाट्य, भाजपमधील अंतर्गत वादात मुख्यमंत्री बदलाचे वारे!

आम्ही या मुख्यमंत्र्यासोबत (Yediyurappa) निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री ( Karnataka CM) शंभर टक्के बदलले गेले पाहिजेत, अशी मागणी आमदारांनी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू 21 मार्च : भारतीय जनता पक्षानं नुकतंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले आहेत. त्रिवेंद्र सिंग रावत यांच्याऐवजी आता तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. उत्तर भारतातील उत्तराखंडनंतर आणि दक्षिणेतही मुख्यमंत्री बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. कर्नाटकचे भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री ( Karnataka CM) शंभर टक्के बदलले गेले पाहिजेत, अशी मागणी केली आहे. यतनाल म्हणाले, की आम्ही या मुख्यमंत्र्यासोबत (Yediyurappa) निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही. या गोष्टीची सरचिटणीस यांनाही कल्पना असेल, असंही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, की पक्षाला आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर मुख्यमंत्री बदलणं अत्यंत गरजेचं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं आपल्यापेक्षा खूप जागा कमी असलेल्या जनता दल सेक्यूलरसोबत गठबंधन करत सरकार स्थापन केलं होतं. विधानसभा निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र कमी जागा मिळालेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्रीपददेखील दिलं होतं. एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले मात्र आमदारांची नाराजी आणि राजीनाम्यामुळं हे सरकार अल्पमतात आलं आणि कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. कुमारस्वामी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं आणि बी.एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनवलं. मात्र, आता भाजपमध्येही मुख्यमंत्र्यांवरुन असंतोष असल्याचं चित्र आहे. अशात यतनाल यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक उच्च न्यायालयानं येडियुरप्पा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या पुराव्याप्रकरणी तपासासाठी परवानगी दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात