अलीगढ - अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (Aligarh Muslim University) एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना हिंदू देव-देवतांच्या संबंधात आक्षेपार्ह गोष्टींचा अभ्यास शिकवण्या प्रकरणी गोंधळ उडाला आहे. एएमयूमध्ये देवतांवर आक्षेपार्ह सादरीकरण केल्याचा आरोप असलेल्या सहाय्यक प्राध्यापक जितेंद्र कुमार यांच्यावरील आरोप विद्यापीठ प्रशासनाने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. प्राध्यापकाविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. प्रकरण पेटल्यानंतर AMU विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांनी फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ जितेंद्र कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यानंतर जितेंद्र कुमार यांनी कुलगुरूंना काउंटर लेटर लिहून माफी मागितली. त्यानंतर ते आक्षेपार्ह मानून त्यांना निलंबित करण्यात आले. माफीनाम्यात काय? मी केलेल्या विधानाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. लैंगिक अत्याचाराशी संबंधित घटना मी पौराणिक घटनांशी जोडल्या आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की मी भविष्यात असे करणार नाही. देवतांबाबत काही अपमानास्पद पौराणिक संदर्भ दिल्याबद्दल मी बिनशर्त माफी मागतो.
पिगी बँकेत नाणी जमा करून मजुरानं खरेदी केली Scooty, पोत्यात पैसे घेऊन पोहोचला शोरूमलाप्राध्यापकाने विद्यार्थ्यांना काय शिकविले? एएमयूच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना वादग्रस्त अभ्यासासाठी प्राध्यापकांचे सादरीकरण दिले जात असल्याचे उल्लेखनीय आहे. प्राध्यापकाद्वारा एका एएमयू च्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना वादग्रस्त अभ्यास शिकवला जात आहे, ही लक्षणीय बाब आहे. त्यात त्याने असे शिकवले की, ब्रह्मदेवाने आपल्या मुलीवर बलात्कार केला होता. तसेच इंद्रदेवाने ऋषी गौतमचे रुप धारण करुन त्यांच्या पत्नीवर बलात्कार केला होता. तसेच भगवान विष्णुने राजा जालंधरच्या पत्नीवर बलात्कार केला, अशा गोष्टी शिकवल्या. तर यानतंर अलिगड मुस्लीम विद्यापीठ प्रशासनाकडे प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.