मराठी बातम्या /बातम्या /देश /बहुरुपी बनून अमृतपाल देतोय पोलिसांना चकवा, आता साधूच्या वेषात पळाला

बहुरुपी बनून अमृतपाल देतोय पोलिसांना चकवा, आता साधूच्या वेषात पळाला

सुरक्षा संस्था आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अमृतपाल साधूच्या वेषात फिरत असल्याचंही म्हटलं जातंय. पप्पलप्रीतही त्याच्यासोबत आहे.

सुरक्षा संस्था आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अमृतपाल साधूच्या वेषात फिरत असल्याचंही म्हटलं जातंय. पप्पलप्रीतही त्याच्यासोबत आहे.

सुरक्षा संस्था आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अमृतपाल साधूच्या वेषात फिरत असल्याचंही म्हटलं जातंय. पप्पलप्रीतही त्याच्यासोबत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 25 मार्च : वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह सध्या फरार आहे. पोलीस त्याला अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत असून देशभरात पथके रवाना कऱण्यात आली आहेत. दरम्यान, अमृतपाल दिल्लीत ISBT बस स्थानकात उतरल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पंजाब पोलिस आणि दिल्ली पोलिसांची टीम दिल्लीसह सीमेला लागून असलेल्या भागात अमृतपालचा शोध घेत आहे.

सुरक्षा संस्था आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अमृतपाल साधूच्या वेषात फिरत असल्याचंही म्हटलं जातंय. पप्पलप्रीतही त्याच्यासोबत आहे. ISBT बस स्थानकात दिल्ली पोलिस आणि पंजाब पोलिसांची पथके तैनात आहेत. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी इंदौरमधून सुक्खा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. हरयाणातून अमृतपालने सुक्खाला फोन केला होता. अमृतपालने कुरुक्षेत्रमधून बलजीत कौरच्या फोनवरून हा फोन केला होता.

काय सांगता! गुन्हा केला 19 व्या वर्षी आणि अटक झाली 68 व्या वर्षी, काय आहे प्रकरण? 

सुक्खा अमृतसरमध्ये राहत असून सध्या मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये वास्तव्याला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी इशारा देताना म्हटलं की, धर्माच्या नावावर पंजाबचं वातावरण बिघडवत आहेत त्यांनी गैरसमजात राहू नये. दरम्यान, हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी पंजाब सरकारवर आरोप करताना म्हटलंय की, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला पकडण्यासाठी पंजाब सरकार गंभीर नाहीय.

पोलीस चौकशीत असाही खुलासा झाला आहे की, अमृतपाल सिंह पंजाबमधून फरार झाल्यानंतर हरियाणात गेला होता. तिथे कुरुक्षेत्रमधील शाहबादमधल्या सिद्धार्थ कॉलनीतल्या एका महिलेच्या घरात थांबला होता. अमृतपाल आणि पप्पलप्रीत सिद्धार्थ कॉलनीत बलजीत कौरच्या घरी थांबले होते. पोलिसांनी सध्या बलजीत कौर हिला अटक केली आहे.

First published:
top videos

    Tags: Punjab