संतोष कुमार (छपरा), 25 मार्च : बिहारच्या छपरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध व्यक्तीला बिहारच्या छपरा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या वृद्ध आरोपीने तरुणपणात हा गुन्हा केला होता, मात्र त्याला म्हातारपणात अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी वयाच्या 19 ते 20 व्या वर्षी गुन्हा करून फरार झाले होते. दरम्यान पोलिसांनी तब्बल 50 वर्षांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींची वये 68 आणि 69 असल्याचे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. जवळपास 50 वर्षे पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात दोघेही यशस्वी झाले होते. 49 वर्षांनंतर रेल्वे चोरीच्या प्रकरणात रेल्वे सुरक्षा पोलिसांनी दोन आरोपींची करून तुरुंगात रवानगी केली आहे.
प्रभू राय आणि गोधन भगत हे मित्र होते. दरम्यान ज्यावेळी गुन्हा केला त्यावेळी एकाचे वय 19 वर्षा तर दुसरा 20 वर्षांचा होता. त्यावेळी दोघांनी चोरीची केली होती. आता प्रभू राय 68 वर्षांचे आहेत तर गोधन भगत 69 वर्षांचे आहेत. दोघांच्या नावे स्टँडिंग वॉरंट काढण्यात आला होता. यामुळे त्यांना तब्बल 50 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. एका आरोपीला नायगाव येथून तर दुसऱ्याला दोरीगंज येथून ताब्यात घेतला आहे. दरम्यान हे दोघेही सोनपूर आणि नयागाव भागातील असले आहेत.
चैत्र नवरात्रीनिमित्त रेल्वेकडून खास भेट, डोंगरगडावर थांबणार 8 एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रकया दोघांसाठी 100 हून अधिक वेळा छापे टाकण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 2001 मध्ये दोघांविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आला होता. आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील साहित्य चोरल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सोनपूर नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसलपूर येथून 68वर्षीय प्रभू राय यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरा 69 आरोपीही दुसऱ्या एका गावातून अटक करण्यात आला आहे. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हे दोघेही गुन्हा क्रमांक 23/74 मध्ये आरोपी आहेत.
अटक करण्यात आलेला गोधन भगत हा पूर्वी नयागावच्या हसीलपूर येथे राहत होता. नंतर त्यांनी येथील मालमत्ता विकून इस्माईलपूर येथे घर बांधले. अटक केल्यानंतर दोघांनाही रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली.
धक्कादायक! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर भंडाऱ्यात कुऱ्हाडीने हल्ला, वाहन पेटवण्याचा प्रयत्नरेल्वे दंडाधिकारी सोनपूर कोर्ट केस क्रमांक 64-2001 आणि यूएस 3 आरपी यूपी कायद्यानुसार कायमस्वरूपी वॉरंट जारी करण्यात आले. आरपीएफचे प्रभारी निरीक्षक रूपेश कुमार स्वतः या छापा टाकणाऱ्या पथकाचे नेतृत्व करत होते.