Home /News /national /

अमोनिया वायुगळतीने देशभरात घेतला अनेक कामगारांचा जीव, जाणून घ्या 2020मधल्या 12 दुर्घटना

अमोनिया वायुगळतीने देशभरात घेतला अनेक कामगारांचा जीव, जाणून घ्या 2020मधल्या 12 दुर्घटना

अमोनियाच्या गळतीने फार नुकसान होत नाही; मात्र जास्त प्रमाणात अमोनियाच्या वायूच्या सान्निध्यात आल्यास मृत्यूही होऊ शकतो.

    नवी दिल्ली 23 डिसेंबर: उत्तर प्रदेशात (UP) प्रयागराजवळच्या फूलपूर येथे अमोनिया वायू गळतीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याने खळबश उडाली होती. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) या कंपनीत झालेल्या या मोठ्या दुर्घटनेत अमोनिया वायूच्या गळतीमुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक कर्मचारी आजारी पडले आहेत. या घटनेमुळे अमोनिया वायू गळतीच्या घटनांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 1984च्या डिसेंबरमध्ये भोपाळमध्ये झालेल्या वायुदुर्घटनेवेळी मिथिल आयसोसायनेट (Methyl Isocynate) वायूची गळती झाली होती. त्या वेळीही अमोनिया (Ammonia) वायूची गळती (Gas Leakage) झाली असावी, असा अंदाज आधी लावण्यात आला होता; मात्र तो वायू अमोनिया नसून मिथिल आयसोसायनेट असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. या वर्षीही अमोनिया वायूची गळती होण्याच्या दुर्घटना देशभर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, या वर्षी देशभरात घडलेल्या अमोनिया वायुगळतीच्या घटनांची माहिती घेऊ या. यंदा अशा जवळपास 12 घटना घडल्या आहेत. तसं पाहायला गेलं, तर अमोनिया वायूची गळती ही तशी सामान्य गोष्ट आहे. केवळ भारतातच नव्हे, तर इंडोनेशिया, युरोप आणि अमेरिकेतही अशा घटना घडत असतात. अमोनियाच्या गळतीने फार नुकसान होत नाही; मात्र जास्त प्रमाणात अमोनियाच्या वायूच्या सान्निध्यात आल्यास मृत्यूही होऊ शकतो. नऊ ऑक्टोबरला गोव्यात (Goa) माझगावच्या कंकोलिम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका मत्स्यप्रक्रिया प्लांटच्या कोल्ड स्टोरेज युनिटमधून अमोनिया वायूची गळती झाली होती. त्यामुळे 22 वर्षांच्या एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तसंच, तीन कामगारांची तब्येत बिघडली होती. शेतकरी आंदोलनाचा पेच सुटेना, चर्चेचं गुऱ्हाळ सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न 20-21 ऑगस्टला आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) चित्तूरमध्ये अमोनिया वायूच्या गळतीची घटना घडली होती. पुटलापट्टू मंडळातल्या बांदापल्ली इथल्या एका दूध डेअरीमध्ये ही गळती झाल्यामुळे 14 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. एक ऑगस्टला पाटण्यात जनकपूरमधल्या एका मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीत अमोनियाची गळती झाल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. फॅक्टरीच्या एका टाकीतून होणाऱ्या वायुगळतीवर एनडीआरएफच्या (NDRF) टीमने योग्य वेळी पोहोचून नियंत्रण मिळवलं होतं. 27 जूनला आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात नांदियालमधल्या एका खासगी फॅक्टरीत वायुगळती होऊन एकाचा मृत्यू झाला होता आणि तिघांची परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. केवळ फॅक्टरीच्या परिसरातच ही गळती झाली होती. सात मे रोजी विशाखापट्टणमच्या एका रासायनिक प्लांटमध्ये अमोनियाची गळती झाली होती. त्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर एक हजाराहून अधिक जणांची प्रकृती बिघडली  होती.  दक्षिण कोरियातल्या (South Korea) एलजी केम या पेट्रोकेमिकल कंपनीच्या मालकीच्या प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली होती. त्यावर दक्षिण कोरियाच्या राजदूतांनीही खेद व्यक्त केला होता. ओढणी गुंडाळून सेल्फी घेण्याच्या नादात बसला गळफास; 12 वर्षांच्या मुलीचा गेला जीव 19 फेब्रुवारीला हरियाणात कुरुक्षेत्रपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाहबाद मरकंडा येथील एका कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये वायुगळती झाल्यामुळे 45 जण प्रभावित झाले होते. त्यापैकी अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. अनेक कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेले असतानाच्या वेळेत गळती झाल्यामुळे मोठी हानी टळली होती. दोन फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात नोएडा येथील हल्दीरामच्या बिल्डिंगमध्ये अमोनियाची गळती होऊन 42 वर्षांच्या एका कामगाराचा मृत्यू झाला होता. आजूबाजूच्या परिसारतील 300 लोकांना दूर नेण्यात आलं होतं. एनडीआरएफच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या