नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : दिल्लीच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. जामिया मिलिया मधला गोळीबार, शाहीनबागचं आंदोलन, अरविंद केजरीवाल वि. अमित शहा अशी लढत या सगळ्यामुळे दिल्लीची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. याच दिवशी गृहमंत्री अमित शहांनी रोड शो मध्ये तलवार हातात घेऊन उंचावली. पहाडगंजच्या रोड शो मध्ये अमित शहांनी जनसमुदायासमोर ही तलवार उंचावून दाखवली.
#WATCH Delhi: Home Minister and BJP leader Amit Shah holds roadshow in Paharganj #DelhiElections pic.twitter.com/5f4FkZ5un6
— ANI (@ANI) February 3, 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापत चाललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या शहादरामध्ये पहिली सभा घेतली.एकविसाव्या शतकातला भारत द्वेषाच्या राजकारणावर नाही तर विकासाच्या धोरणावर चालेल, असं मोदी म्हणाले.भारताच्या फाळणीनंतर जे लोक दिल्लीत आले त्यांनी दिल्ली बदलली आहे. जे इथे स्थिरावले त्यांनी दिल्लीच्या विकासात योगदान दिलं. दिल्लीच्या मातीत इथल्या लोकांनी घाम गाळला आहे, असं त्यांनी सांगितलं. दिवसरात्र मेहनत 8 फेब्रुवारीला दिल्लीत होणारं मतदान फक्त दिल्लीलाच नाही तर देशाचा विकास उंचीवर नेणारं असेल. भाजप नकारात्मक नाही तर सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवतं. आमच्यासाठी देशाचं हित सगळ्यात मोठं आहे. देशासमोर जी आव्हानं होती ती सोडवण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करत आहोत,असंही मोदी म्हणाले. (हेही वाचा : ‘मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग’, केजरीवाल यांची भाजपवर टीका) झुग्गीसारख्या छोट्याछोट्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना पक्कं घर देण्यासाठी वेगाने काम केलं जाईल, असं मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये बेकायदेशीर वसाहतींची समस्या होती. या घरांची नोंदणी आपण करू शकू, असं या नागरिकांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ही नोंदणी प्रत्यक्षात होते आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. ==========================================================================