मुंबई, 21 फेब्रुवारी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं मुस्लिमांना तिकीट का देत नाही? या प्रश्नाचं रोखठोक उत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत हिंदू-मुस्लीम मुद्दा, मतांचे ध्रुवीकरण, 80 विरूद्ध 20 या सर्व विषयांवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
अमित शहा यांनी Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटन इन-चीफ
राहुल जोशी (Rahul Joshi) यांना विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीशी संबधित अनेक प्रश्नांना थेट उत्तरं दिली आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात भाजपा यंदा 300 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा सरकार बनवेल असा दावा केला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी दावा केला की, उत्तर प्रदेशात भाजपा सरकारच्या कार्यकाळात सर्व धर्म आणि जातींच्या विकास योजनांवर काम झाले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारची प्रशंसा केली. भाजाने शेतकरी, तरूण, महिला आणि सर्व वर्गांसाठी काम केले आहे, असे सांगितले.
मुस्लिमांना तिकीट का नाही?
योगी आदित्यनाथ यांनी 80-20 चा उल्लेख केला आहे. त्यांचा हा उल्लेख म्हणजे हिंदू- मुस्लीमांचे विभाजन नाही, असा दावा अमित शहा यांनी केला. 'ध्रुवीकरण नक्की होत आहे. गरीब आणि शेतकऱ्यांचेही ध्रुवीकरण होत आहे. भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनेचे पैसे मिळत आहेत. आम्ही व्होट बँकेच्या भूमिकेतून पाहात नाही. ज्यांचा अधिकार असेल त्यांच्या बाजूने सरकार आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.
आमचं मुस्लिमांशी तेच नात आहे, जे सरकारचं असणे आवश्यक आहे. निवडणुकीत कोण मत देतं ते देखील पाहिलं पाहिजे असं गृहमंत्र्यांनी 'भाजपा मुस्लिमांना तिकीट का देत नाही?' या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
Exclusive | यूपीमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, लोकांचा पाठिंबा असल्याचा अमित शाह यांचा दावा
गृहमंत्र्यांनी उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या चांगल्या कामगिरीचं कारण सांगितलं. उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. अमित शहा यांची संपूर्ण मुलाखत आज रात्री 8 वाजता न्यूज 18 नेटवर्कच्या सर्व चॅनलवर तुम्ही पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.