भारताविरोधात F-16 वापरून पाकिस्ताननं थेट अमेरिकेशी घेतला पंगा?

भारताविरोधात F-16 वापरून पाकिस्ताननं थेट अमेरिकेशी घेतला पंगा?

भारताविरोधात F-16 विमानांचा वापर केल्यानं पाकिस्ताननं आता अमेरिकेची नाराजी ओढवून घेतली आहे.

  • Share this:

दिल्ली, 1 मार्च : भारताच्या एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारताविरोधात F-16चा वापर केला. पण, भारतानं F-16 विमानाला पाडून पाकला चांगलाच धडा शिकवला.  पाकनं मात्र सवयीप्रमाणे भारताचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पण, त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण, भारतानं ठोस पुराव्यासह पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला.

गुरूवारी संध्याकाळी तिन्ही सेना दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला करण्यासाठी F-16 विमानाचा वापर केला होता, हे पुराव्यानिशी सिद्ध केलं. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्ताननं भारतावर अॅमराम क्षेपणास्त्र देखील डागलं. हे क्षेपणास्त्र केवळ F-16 विमानावरूनच डागलं जावू शकतं. पत्रकार परिषदेमध्ये भारतानं तसे पुरावे सादर केले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर पडला असून त्याला आता अमेरिकेची नाराजी देखील ओढावून घ्यावी लागणार आहे.

सैन्याधिकारी म्हणतात, 'बालाकोट'चेही पुरावे आहेत, त्याबद्दल भारत सरकार घेईल निर्णय

अमेरिकेच्या नाराजीचं कारण काय?

अमेरिकेनं पाकिस्तानला F-16 ही विमानं दिली. पण, विमानं देताना ती केवळ दहशतवाद्यांविरोधात वापरावीत अशी अट होती. शिवाय, स्वसंरक्षणाशिवाय युद्धासाठी F-16चा वापर करता येणार नाही असा या करारामध्ये उल्लेख आहे. पण, भारताविरोधात कारवाई करताना पाकिस्ताननं हे सारे नियम पायदळी तुडवले. त्यामुळे करारातील नियमांचा भंग झाला. तसेच भारतानं आता पुरावे दिल्यानं पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या. परिणामी, आता पाकिस्तानविरोधात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कठोर पावलं उचलू शकतात.

यापूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानची आर्थिक मदत देखील थांबवलेली आहे. त्यामध्ये भर म्हणून अमेरिका नाराज झाल्यास पाकिस्तानची कोंडी वाढू शकते.

लादेनचा मुलगा हमजावर अमेरिकेचं 7 कोटी रुपयांचं इनाम

अमेरिका एकटी

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर जसास तसे उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचं भारताच्या हद्दीत घुसलेले F-16 विमान भारतानं पाडलं. यावर आता भारताने पुरावे देखील सादर केले आहे. शिवाय, OICनं देखील भारताला निमंत्रण पाठवल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडला. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं तर संयुक्त राष्ट्र संघात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरोधात ठराव मांडला. या साऱ्या घडामोडी पाहता भारताला धमकावणारा पाकिस्तान आता थाऱ्यावर आला आहे.

35 भारतीय प्रवासी पाकिस्तानात अडकले, लाहोर स्थानकावरील EXCLUSIVE VIDEO

First published: March 1, 2019, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading