भोपाळ, 26 जून : पत्नीच्या गालाला स्पर्श करण्यास विरोध केला म्हणून पतीला जबर मारहाण (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणारे दोघेजण त्याचेच मित्र होते. मारहाण केल्यानंतर या दोन मित्रांनी पीडित व्यक्तीचा डोळाही फोडला. त्याने दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्कीची पत्नी दीड महिन्यापूर्वी नाराज होऊन माहेरी निघून गेली होती. समजूत काढल्यानंतरही ती परतली नाही. शनिवारी लक्कीची पत्नी माहेराहून परत पतीच्या घरी आली. लक्की बिल्डींगच्या खाली उभं राहून पत्नीशी बोलत होता. यादरम्यान त्याचा मित्र अजय त्रिपाठी तेथे आला. अजयसोबत त्याचा मित्र चीना ठाकूरदेखील होता. अजयदेखील आपल्या मित्राच्या पत्नीची समजूत काढू लागला. यादरम्यान अजयसोबत आलेला एक अन्य मित्र चीनाने लक्कीच्या पत्नीच्या गालाला स्पर्श करू लागला. लक्कीने याचा विरोध केला. यावर तिघांमध्ये वाद सुरू झाला. हे भांडण इतकं वाढलं की, अजय आणि चीनाने लक्कीला खूप मारहाण केली. दोघांनी लक्कीला जमिनीवर पाडून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. सोबतच टाळ्याने डोळ्यावर हल्ला केला. यात लक्कीचा एक डोळा फुटला. तक्रारीवर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एक हिस्ट्रीशीटर.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा आरोपी एक हिस्ट्रीशीटर आहे. लक्कीने दिलेल्या माहितीनुसार, चीना आदनत आरोपी आहे. त्याच्याविरोधात लूट-मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला आहे. पोलीस आता दोघांचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







