प्रयागराज, 01 सप्टेंबर : नागरिकत्व दुरस्ती कायहा (CAA) आणि एनआरसीविरुद्ध (NRC) प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप असलेल्या आणि जेलमध्ये असलेले डॉ. कफील खान यांना अलहादाबात हाय कोर्टानं मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने त्यांच्यावर लावलेले आरोप काढून टाकत एनएसएला चुकीचे ठरवले आहे. तसेच डॉ. कफील खान यांना तुरूंगात टाकणे वाईट होते असे कोर्टाने म्हटले आहे. यासोबतच डॉ. कफील यांना तातडीने सोडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपांतर्गत डॉ.कफील खान मथुरा कारागृहात आहेत. या प्रकरणी डॉ. कफील खान यांच्या आई नुजहत परवीन यांच्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सरन्यायाधीश गोविंद माथूर आणि न्यायमूर्ती एस.डी. सिंह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
Allahabad High Court grants conditional bail to Dr Kafeel Khan (in file pic).
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 1, 2020
He was booked under National Security Act (NSA) & arrested from Mumbai in January this year, for his alleged provocative speech at Aligarh Muslim University in December 2019, amid anti-CAA protests. pic.twitter.com/udv7ni1u0g
सुप्रीम कोर्टाने 15 दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या विशेष म्हणजे 11 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने डॉ. कफील खान यांच्या आईच्या अर्जावर 15 दिवसांत निर्णय घेण्यास अलाहाबाद हाय कोर्टाला सांगितले होते. डॉ. कफील यांना एनएसए अंतर्गत अलिगड मुस्लिम विद्यापीठात (AMU) CAAच्या निषेधार्थ प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपांतर्गत तुरुंगात टाकले गेले. त्यांच्यावर एनएसए तीन वेळा वाढविण्यात आला आहे. डॉ. कफील यांच्यासाठी सोशल मीडियावर सुरू होती मोहिम यापूर्वी डॉ. कफील यांच्या पत्नीनेही 4 ऑगस्ट रोजी ट्विटरवर आपल्या पतीच्या सुटकेसंदर्भात एक मोहीम सुरू केली होती, ज्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. 13 डिसेंबर 2019 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषण देण्याच्या आरोपाखाली डॉ. कफील यांना यावर्षी जानेवारीत मुंबईतून अटक करण्यात आली होती.