मुंबई, 18 जुलै : आज सकाळी इंदूरमधील (Indore Bus Accident) बातमीने अनेकांना धक्का बसला. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमधून निघालेली एसटी महामंडळाची बस प्रवाशांसह पुलावरुन खाली कोसळली. त्यावेळी पावसाचंही उधाण होतं. आणि पुलावरुन जाताना अख्ख्या बसने नर्मदेत जलसमाधी घेतली. जेव्हा या बसचा सांगाडा बाहेर काढण्यात आला तेव्हा ते दृश्य पाहून धक्काच बसला.
दरम्यान या घटनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इंदूर-अमळनेरला जाणाऱ्या बस अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या बसमधून एकही जखमी प्रवासी सापडलेला नाही. बसमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांची केला खुलासा
खलघाट एसटी महामंडळ अपघातात बसमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी 3 अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून या बसमधील VTS अर्थात व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीमचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. इतर राज्यातील प्रवासी असले तरी त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकार 10 लाखांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी याबाबत माहिती दिली.
सुरुवातील या बसमध्ये 40 प्रवासी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अपघात घडला तेव्हा बसमध्ये 10 प्रवासी होते अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.. याशिवाय चालक आणि वाहक होते. असून मिळून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. वेगवान कारला ओव्हरटेक करत असताना कदाचित नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली, असं धर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाळासाहेब खिस्ते यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू
अरवा मूर्तुजा बोहरी (वय 27, रा. मूर्तिजापूर, अकोला, अमळनेरच्या माहेरवाशीण), बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (वय 45, रा. अमळनेर), बस वाहक प्रकाश श्रावण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर), निंबाजी आनंदा पाटील (वय 60, रा. पिळोदा, ता. अमळनेर), कमला निंबाजी पाटील (वय ५५, रा पिलोदा ता. अमळनेर) हे सर्व चौघही अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहे. अरवा मूर्तुजा बोहरी यांचं अमळनेरला माहेर आहे. त्यामुळे त्या इंदूरहून माहेरी जात असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indore News, Madhya pradesh, St bus accident