नवी दिल्ली, 6 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लडाखमधील गलवान खोऱ्य़ातून चिनी सैन्याला मागे हटवण्यासाठी आपल्या सर्वात मजबूत राजनैतिक शस्त्राचा वापर केला आहे. केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांना पुढे ठेवले होते आणि रविवारी त्यांनी चीनचे पंतप्रधान वांग यी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे दोन तास चर्चा केली.
भारताच्या कठोर भूमिकेनंतर चीनकडे माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. चीनने अॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने ड्रॅगनला घेराव घातला यामुळे बीजिंग पूर्णपणे हादरले. या संभाषणात, गलवानमधील तणाव कमी करण्याचेही चीनने मान्य केले आहे.
हे वाचा-भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण
National Security Advisor (NSA) Ajit Doval held talks with Chinese Foreign Minister and State Councilor Wang Yi over video call yesterday. Sources say talks were held in a cordial and forward-looking manner pic.twitter.com/rDRf1LSM6A
— ANI (@ANI) July 6, 2020
डोवाल अॅक्शनमध्ये, चीन झुकला
डोवाल यांनी वांग यी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. लडाख सीमेवर दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्यामागचे हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. 15 जून रोजी गलवान खोऱ्याबाबत आलेल्या न्यूजमध्ये दोन्ही बाजूंच्या रक्तरंजित संघर्षात 20 भारतीय सैनिक शहीद झाले तर यात 40 चिनी सैनिक ठार झाले.
डोवाल यांच्या चर्चेनंतर चीनने गलवान खोऱ्यातल्या लढाऊ जागेपासून दीड किलोमीटर अंतरावर आपले सैन्य मागे घेतले आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी कमांडर-स्तरीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.
गॅलवान पुन्हा होऊ नये की यावरही चर्चा
डोवाल यांनी काल व्हिडीओ कॉलवर चीनचे परराष्ट्रमंत्री आणि राज्य सल्लागार वांग यी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही बाजूंचे संवाद अत्यंत सौहार्दपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण होते. गलवान खोऱ्यासारख्या भविष्यात होणाऱ्या घटना रोखण्यासाठी आणि शांतता राखण्याबाबत दोघांनी चर्चा केली, जेणेकरुन अशी भीषण परिस्थिती आणखी निर्माण होऊ नये.
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे