Air Strikeनंतर पाकिस्तानी विमानं भारताच्या हद्दीत घुसली? काय म्हणाले हवाई दल प्रमुख

Air Strikeनंतर पाकिस्तानी विमानं भारताच्या हद्दीत घुसली? काय म्हणाले हवाई दल प्रमुख

Air Strike नंतर Pakistani Air Forceचं एकही विमान LOC पार आलं नसल्याची माहिती हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जून : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये 200 ते 250 दहशतवादी ठार झाले. त्यामुळे पाकिस्ताननं देखील भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचे नापाक इरादे फोल गेले. भारतीय विमानांनी त्यांना माघारी पिटाळून लावलं. भारतीय हवाई दलाच्या ताकदीपुढे पाकिस्तानी हवाई दलाचं काहीच चाललं नाही. पण, पाकिस्ताननं मात्र भारताच्या हवाई हद्दीत घुसल्याचा दावा केला. त्याला आता भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानचं एकही विमान घुसलं नाही. पण, एअर स्ट्राईक करताना भारतीय विमानांनी आपलं लक्ष्य साध्य केलं. पण, पाकिस्तानचं एकही विमान LOC पार आलं नसल्याचं' बी. एस. धनोआ यांनी म्हटलं आहे.

अभिनंदन यांचं साहस

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. पण, 12व्या दिवशी मध्यरात्री भारतीय हवाई दलानं बालाकोट येथे दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पकिस्ताननं देखील भारतीय हवाई हद्दीत केलेला प्रवेशाचा आणि हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं. त्यानंतर, अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. अखेर भारताच्या दबावापुढे झुकत पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांना सोडून दिलं होतं.

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या