श्रीनगर, 14 जुलै: जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पुलवामा सेक्टरमध्ये (Pulwama Sector) आज सकाळी भारतीय लष्कर (Indian Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक झाली आहे. या चकमकी (Encounter) दरम्यान आतापर्यंत भारतीय सैन्याच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. आता जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. भारतीय सैन्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.
पुलवामा सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर सैन्यांच्या जवानांनी या परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यानंतर दहशतवादी आणि जवानांनामध्ये गोळीबार सुरु झाला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अजूनही या भागात दोन दहशतवादी लपून बसले आहेत.
Jammu & Kashmir: Security personnel deployed in Pulwama town where an encounter broke out earlier today. Operation underway.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/V4agNs0OeT — ANI (@ANI) July 14, 2021
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करचा कमांडर अबू हुरैरा याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांचे मृतदेह ही जवानांनी ताब्यात घेतले आहेत.
Encounter breaks out at Pulwama town of South Kashmir. Police and security forces are on the job. Details awaited: Jammu & Kashmir Police
— ANI (@ANI) July 13, 2021
आयजीपी काश्मीरने सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा आहे. यासह दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले आहेत. तथापि, अद्याप सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे.
कायम नागरिकांच्या संपर्कात असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील BJP नगरसेविकेचं निधन
एका महिन्यात 12 दहशतवादी ठार
जुलै महिन्याच्या 14 दिवसात जम्मू काश्मीरमध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याआधी 2 जुलै रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर 8 जुलै रोजी 2 पाकिस्तानी दहशतवादी चकमकी दरम्यान मरण पावले. या ऑपरेशनमध्ये एक ज्युनियर कमिशन ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले. 12 जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये दादलच्या जंगलात जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.