जाहिरात
मराठी बातम्या / देश / शहाजहानच्या कबरीवर चढवली जगातील सर्वांत लांबीची चादर, वाचा काय आहे खासियत

शहाजहानच्या कबरीवर चढवली जगातील सर्वांत लांबीची चादर, वाचा काय आहे खासियत

शहाजहानच्या कबरीवर चढवली जगातील सर्वांत लांबीची चादर, वाचा काय आहे खासियत

ताजमहालच्या तळघरातील शहाजहान आणि मुमताज यांच्या कबरीवर चादर चढवली गेली. या चादरीची लांबी 1480 मीटर आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 20 फेब्रुवारी :  मुघल सम्राट शहाजहानचा 368 वा उर्स (उरुस) आग्रा येथील ताजमहालमध्ये 17 ते 19 फेब्रुवारी 2023 या काळात उत्साहात व शांततेत पार पडला. या निमित्तानं जगातील सर्वांत लांब चादर पोशीचा विधी झाला. विशेष म्हणजे शहाजहानच्या 368 व्या उर्सनिमित्त सलग तीन दिवस दररोज वेगवेगळे विधी आयोजित केले होते. रविवार (19 फेब्रुवारी) रोजी शेवटच्या दिवशी चादर पोशीचा विधी केला गेला. ताजमहालच्या दक्षिणेकडील दरवाजातून ताजमहालच्या तळघरातील शहाजहान आणि मुमताज यांच्या कबरीवर चादर चढवली गेली. या विविधरंगी हिंदुस्थानी चादरीनं पर्यटकांचं लक्ष वेधून घेतलं. काय आहे खासियत? खुद्दाम-ए-रोजा ताजमहल उर्स कमिटीचे अध्यक्ष ताहिरउद्दीर ताहिर यांनी सांगितलं की, ‘ही चादर परस्पर सौहार्दाचं लक्षण आहे. ही चादर कोणत्याही हिंदू किंवा मुस्लिमांची नाही. तर ती सर्वधर्माच्या लोकांची आहे. दरवर्षी कबरीवर चढवल्या जाणाऱ्या चादरीची लांबी वाढवण्यात येते. शहाजहानच्या 368 व्या उर्सच्या निमित्तानं बहुरंगी भारतीय कापडापासून बनवलेली 1480 मीटर लांबीची चादर ताजमहालच्या तळघरापर्यंत नेण्यात आली. ही चादर जगातील सर्वांत लांब चादर असल्याचा दावा केला जात आहे. ती परस्पर बंधुभावाचं प्रतीक आहे. प्रेमाची नगरी असलेल्या आग्रा येथे ही चादर गंगा-जमुना नद्या एकत्र असल्याचे प्रतीक आहे. उर्सच्या निमित्तानं समितीनं शांतता आणि बंधुभावाची प्रार्थनाही केली.’ चारधाम यात्रेला जायचा प्लॅन करताय? तर थांबा! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ‘धर्माच्या नावावर राजकारण’ ताजमहालाचा वादाशी संबंध नवीन नाही. या पूर्वीही शहाजहानचा उर्स सुरू होण्यापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी महाशिवरात्रीनिमित्त ताजमहालमध्ये रुद्राभिषेक करण्याची मागणी केली होती. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित लोकांनी या मागणीसाठी धरणं आंदोलन केलं होतं. ताहिरउद्दीर ताहिर याबाबत म्हणाले की, ‘अशा संघटनांचे लोक धर्माच्या नावावर लोकांमध्ये वाद निर्माण करण्याचं काम करतात. ताजमहालच्या जागी शिव मंदिर असल्याचा दावा करून धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं जात आहे. 45 वर्षांपासून आम्ही चादर चढवत आहोत. हे लोक तेव्हा कुठे होते? आता हे लोक क्षुद्र राजकारण करीत असून, ताजमहालाचं नाव बदनाम करीत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक, मिरासाहेबांच्या ऊरूसाला जल्लोषात प्रारंभ, Photos दरम्यान, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शहाजहानचा उर्स ताजमहालमध्ये 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत उत्साहात व शांततेत पार पडला. या तीन दिवसांमध्ये ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. यंदाच्या वर्षी हा उर्स पाहण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली होती. उत्सवानिमित्त विविध विधीही ताजमहालामध्ये झाले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात