आग्रा, 19 फेब्रुवारी : महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शिवजयंतीनिमित्त आग्र्यातील लाल किल्ल्यातील दिवान ए आममध्ये ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी किल्ल्यात जाणाऱ्या शिवप्रेमींना शिवरायांचा पुतळा आतमध्ये नेऊ न दिल्याने गोंधळ झाला. यानंतर शिवप्रेमींनी किल्ल्याच्या दारातच ठिय्या मांडला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आग्रा किल्ल्यावर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आग्रा किल्ल्यात आयोजित केलेला हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवप्रेमींना रोखल्यानं मोठा गोंधळ झाला. शिवप्रेमी आणि पोलिसात बाचाबाचीसुद्धा झाली. हेही वाचा : अमित शहा लिहिणार छत्रपती शिवरायांवर पुस्तक, मुख्यमंत्री शिंदेंनी दिली बातमी पोलिसांनी शिवप्रेमींना दारातून मागे ढकलले आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आतमध्ये नेऊ दिला नसल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. यानंतर शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. तसंच आग्रा किल्ल्यात जाऊ देण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली. यावेळी शिवप्रेमींनी प्रचंड घोषणाबाजीही केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.