बापरे ! BSPऐवजी BJPला केलं मतदान, पश्चाताप झाल्यानं त्यानं स्वतःचं बोटच कापलं

बुलंदशहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 06:47 AM IST

बापरे ! BSPऐवजी BJPला केलं मतदान, पश्चाताप झाल्यानं त्यानं स्वतःचं बोटच कापलं

लखनौ, 19 एप्रिल : बुलंदशहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकारपूर परिसरातील एका दलित मतदारानं गुरुवारी (18 एप्रिल)लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान बीएसपीऐवजी भाजपला मत दिलं, म्हणून त्यानं चक्क स्वतःचंच बोट कापून घेतलं. 'हिंदुस्‍तान टाइम्‍स'नं दिलेल्या वृत्तानुसार, या मतदाराला बसपच्या उमेदवाराला मतदान करायचं होतं. पण त्यानं चुकून भाजपच्या चिन्हासमोरील बटण दाबलं. यानंतर त्याला पश्चाताप होऊ लागला, म्हणून त्यानं थेट स्वतःचं बोटच कापलं.

पवन कुमार (25 वर्ष) असं मतदाराचं नाव आहे. बुलंदशहरातील शिकारपूर येथील अब्दुल्लापुर हुलासन गावातील तो रहिवासी आहे. पवन कुमारला सपा-बसपा-रालोद आघाडीचे उमेदवार योगेश वर्मा यांना मत द्यायचं होतं. पण चुकून त्यानं भाजप उमेदवार भोला सिंह यांना मतदान केलं. पवनला स्वतःच्याच चुकीचा इतका पश्चाताप होऊ लागला की त्यानं बोट कापून स्वतःला शिक्षा दिली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT : पुण्यात हेल्मेट सक्ती नको म्हणून चक्क निवडणूक रिंगणात; आणि चिन्ह...

Loading...

उत्तर प्रदेशात राहुल गांधींनी सपा-बसपालाही घेतलं अंगावर

VIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 06:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...