मराठी बातम्या /बातम्या /देश /गायक केकेच्या मृत्यूनंतर कोलकाताच्या खासदाराने उपस्थित केला मोठा सवाल...

गायक केकेच्या मृत्यूनंतर कोलकाताच्या खासदाराने उपस्थित केला मोठा सवाल...

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) याच्या निधनानंतर (Singer Krishnakumar Kunnath (KK) died) सुरू असलेल्या वादात आता तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदाराने नवा प्रश्न उपस्थित केला आहे.

कोलकता, 19 जून : प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) याच्या निधनानंतर (Singer Krishnakumar Kunnath (KK) died) सुरू असलेल्या वादात आता तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदाराने नवा प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईतून इतक्या महागड्या कलाकाराला फेस्टसाठी बोलवण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित (Kolkata News) करीत कॉलेज फेस्ट फंडच्या सोर्सवर बोट ठेवलं आहे. 31 मे रोजी कोलकताच्या नजरूज मंचात गुरुदास कॉलेजसाठी परफॉर्मन्स दिल्यानंतर केकेचं निधन झालं. यानंतर विरोधी पक्षांनी अशा प्रकार महागड्या कॉलेज फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी फंडच्या सोर्सबाबत सवाल उपस्थित केला आहे.

तृणमूल कॉग्रेसचे वरिष्ठ नेता आणि तीन वेळा पार्टीचे खासदार असलेले सौगत रॉयने सवाल उपस्थित केला आहे. शनिवारी रात्री उशिरा पक्षाच्या एका कार्यक्रमात माजी सेवानिवृत्त प्रोफेसर रॉय म्हणाले की, ते विद्यार्थी दशेत असतानाही कॉलेजमध्ये फेस्टिवल वा फ्रेशर्सच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा ट्रेंड होता. ते पुढे म्हणाले की, केके एक स्टेज परफॉर्मेंन्ससाठी कोलकत्याला आले होते. येथे त्यांचं निधन झालं.

गुंड आणि प्रमोटरांना शरण जात आहेत विद्यार्थी?

टीएमसी खासदार पुढे म्हणाले, 'कधीकधी मला प्रश्न पडतो की अशा कामांचा खर्च भागवण्यासाठी 50 लाख रुपये कुठून येतात? हे पैसे कोण पुरवतं? एवढ्या पैशासाठी विद्यार्थी स्थानिक गुंडांना आणि प्रमोटरांना शरण जात आहेत का? मी मनोरंजनाच्या विरोधात नाही. पण माझा प्रश्न असा आहे की जर विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच शरणागती पत्करली तर ते दीर्घकाळ कसे लढतील.

First published:

Tags: Heart Attack, Kolkata