मुंबई, 4 जून- बॉलिवूड (Bollywood) गायक केकेच्या (Singer KK) आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. केके शरीराने जगात नसला तरी, तो आपल्या गाण्यांद्वारे चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत असेल. केके (कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके) यांना जवळून ओळखणारे सहकारी मित्र त्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की केकेचं संपूर्ण आयुष्य त्यांचं कुटुंब आणि संगीतात गेलं. शेवटपर्यंत त्याने चाहत्यांसाठी गाणं गायिलं.आपली कला सादर करत जगाचा निरोप घेतला. त्याच्या अशा अचानक एक्झिटने कुटुंबासह त्याचे खासमित्रही अत्यंत दुःखी आहेत. सर्वलोक केकेच्या आठवणीत भावुक होत आहेत. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी आपल्या खास मित्रासोबत घालवलेल्या खास क्षणांची आठवण सांगितली आहे.
शंकर महादेवन आणि केके यांची मैत्री फारच खास आणि जुनी आहे. दोघांनीही रसिकांना अशी गाणी दिली, जी अनेक वर्षांनंतरही आज तितकीच लोकप्रिय आहेत. केकेने शंकर महादेवनसोबत 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहते रहे' सारखी सुपरहिट गाणी दिली आहेत. मित्र केकेच्या निधनानंतर शंकर महादेवनने त्याच्या आणि केकेच्या बॉन्डिंगचा खुलासा केला आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय सांगितलंय.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, केके आणि शंकर महादेवन यांची खूप चांगली मैत्री होती. यामुळेच त्यांच्याशी बोलताना त्यांना केके हो'ता' असं म्हणणं आणि यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. शंकर महादेवन म्हणाले, “आम्ही चित्रपटात येण्यापूर्वीच आमचा बराच काळ संबंध होता, आम्ही एका गॅंगसारखे मित्र होतो.आम्ही एकत्र जिंगल्स गायचो आणि नंतर त्याचे चित्रपटात रूपांतर झाले. आम्ही केलेल्या पहिल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'दिल चाहता है'. ज्यामध्ये 'कोई कहे' हे एक अतिशय खास गाणं होतं. जे आम्ही एकत्र गायलं होतं'.
आपल्या खास मित्राची आठवण करून देत त्यांनी म्हटलं, 'केके जेव्हा स्टुडिओत एंट्री घेत असे, तेव्हा तो आपल्या सोबत खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन यायचा. 20-30 मिनिटे तो इकडे तिकडे फिरायचा आणि नंतर तासनतास बोलत बसायचा. शंकर महादेवन म्हणाले की काही महिन्यांपूर्वी आम्ही एका टीव्ही शोमध्ये भेटलो होतो, आम्ही सर्व त्याला चिडवत होतो 'तू बेंजामिन बटन सारखा आहेस, कारण तू म्हातारा होत आहेस'. ते अद्भुत क्षण कधीच विसरता येणार नाहीत'.
(हे वाचा:केकेनंतर आणखी एका तरुण संगीतकार-गायकाचं निधन, वयाच्या 22 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास )
केकेबद्दल बोलताना महादेवन यांनी पुढे सांगितलं, 'केके हा कौटुंबिक माणूस होता. तो पार्टीला न जाता कुटुंबासोबत वेळ घालवत असे. महादेवन म्हणाले की, तो अनेकदा आपल्या कुटुंबाबद्दल बोलत असे, त्यांच्यासोबत दीर्घ सुट्टीवर जात असे. त्याला सोशल मीडियाचीही पर्वा नव्हती आणि त्याहीपेक्षा त्याने व्हॉट्सअॅप कधीच वापरलं नाही. त्याच्याशी बोलायचं झालं तर थेट फोन करावा लागत. त्याच्या गाण्यांना किती लाईक्स मिळतात याची काळजीही त्याला कधीच नव्हती''.अशा अनेक आठवणी शंकर महादेवन यांनी सांगितल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.