VIDEO : गुजरातच्या केमिकल कारखान्यात मोठा स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू, 57 जण जखमी

VIDEO : गुजरातच्या केमिकल कारखान्यात मोठा स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू, 57 जण जखमी

स्फोट झाल्यानंतर जखमी कामगारांना तातडीने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले

  • Share this:

भरुच, 3 जून : गुजरातमधील दहेज येथील केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटामुळे झालेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  तर 57 जण जखमी झाले आहेत. दहेजच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात हा स्फोट झाला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये, रासायनिक प्लांटच्यावरील धुरांचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझविण्यासाठी तातडीने घटनास्थळी हजर झाल्या. भरुच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. व्ही. चुडासमा म्हणाले, "आतापर्यंत 5 कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कारखान्यातून काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. ”पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, जखमी झालेल्या 40 कर्मचाऱ्यांना भरुच आणि वडोदरा येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे वाचा -निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात आज कोणतीही प्रगती नाही - हवामान विभाग

First published: June 3, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या