मराठी बातम्या /बातम्या /देश /गोळी मारल्यानंतर तालिबान अतिरेक्यांनी दानिश सिद्दीकी यांचं डोकं कारखाली चिरडलं, अफगान कमांडरनं सांगितलं धडकी भरवणारं सत्य

गोळी मारल्यानंतर तालिबान अतिरेक्यांनी दानिश सिद्दीकी यांचं डोकं कारखाली चिरडलं, अफगान कमांडरनं सांगितलं धडकी भरवणारं सत्य

Danish Siddiqui Death Update: आतापर्यंत दानिश यांच्या मृत्यूमागे अफगान सैन्य (Afghan military) आणि तालिबान (Taliban) यांचा हात असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता जी माहिती समोर आली आहे ती भयानक आहे.

Danish Siddiqui Death Update: आतापर्यंत दानिश यांच्या मृत्यूमागे अफगान सैन्य (Afghan military) आणि तालिबान (Taliban) यांचा हात असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता जी माहिती समोर आली आहे ती भयानक आहे.

Danish Siddiqui Death Update: आतापर्यंत दानिश यांच्या मृत्यूमागे अफगान सैन्य (Afghan military) आणि तालिबान (Taliban) यांचा हात असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता जी माहिती समोर आली आहे ती भयानक आहे.

नवी दिल्ली, 21 जुलै: पुलित्‍जर पुरस्‍कार विजेता फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी (Journalist Danish Siddiqui) यांच्या मृत्यूनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंत दानिश यांच्या मृत्यूमागे अफगान सैन्य (Afghan military) आणि तालिबान (Taliban) यांचा हात असल्याचं बोललं जात होतं. दानिश (Danish Siddiqui) यांच्या डेथ सर्टिफिकेटमध्येही (Death Certificate) गोळी लागल्यानं मृत्यू झाला असल्याचं कारण नमूद करण्यात आलं. मात्र आता जी माहिती समोर आली आहे ती भयानक आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी त्यांना केवळ गोळी मारली नसून त्यांचं डोकंही कारखाली चिरडल्याचं समजतंय.

आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, अफगान सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तालिबाननं दानिशच्या मृतदेहासोबत कसं वाईट कृत्य केलं हे त्यांनी सांगितलं आहे. अहमद यांनी सांगितलं की, दानिश भारतीय होते आणि तालिबान भारताचा राग करतात म्हणून त्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना केली.

Weather Update: महाराष्ट्रातल्या 'या' 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी

16 जुलै रोजी दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. अफगान सैन्य आणि तालिबान यांच्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे. अफगान सैन्यानं जेव्हा पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची तालिबानशी चकमक झाली. या चकमकीत एका अफगान अधिकाऱ्यासह दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

मात्र आता समोर आलेली माहिती त्याहून भयानक आहे. बिलाल अहमद गेल्या 5 वर्षांपासून अफगान सैन्यात तैनात आहेत. आता ते कमांडर पोस्टवर आहेत. त्यांनी सांगितलं, तालिबानच्या अतिरेक्यांनी सुरुवातीला दानिश सिद्दीकीला गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिरेक्यांना समजलं की दानिश भारतीय आहेत. त्यामुळे त्यांनी दानिश यांच्या डोक्यावर गाडी चढवली. त्यांचा मृत्यू झाला आहे हे माहित असून अतिरेक्यांनी हे वाईट कृत्य केलं. तालिबान भारत आणि भारतीयांचा द्वेष करतात. यासाठी त्यांनी दानिश यांच्या मृतदेहाची विटंबना केली.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban