मराठी बातम्या /बातम्या /देश /

दारूच्या नशेत केलं लग्न, शुद्धीत आल्यावर पत्नीनं मागितला घटस्फोट; पती हसला आणि म्हणाला...

दारूच्या नशेत केलं लग्न, शुद्धीत आल्यावर पत्नीनं मागितला घटस्फोट; पती हसला आणि म्हणाला...

पत्नीनं दारूच्या नशेत लग्न केलं आणि शुद्धीत आल्यावर पतीकडे घटस्फोटाची मागणी (After marriage wife demands divorce to her husband) केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news
ग्वालियर, 17 ऑक्टोबर :  पत्नीनं दारूच्या नशेत लग्न केलं आणि शुद्धीत आल्यावर पतीकडे घटस्फोटाची मागणी (After marriage wife demands divorce to her husband) केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. लग्न करताना ही महिला (wife was drunken while marriage)  दारुच्या नशेत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती पूर्ण शुद्धीत आली, तेव्हा तिनं पतीला ही बाब सांगितलं. सुरुवातीला हे ऐकून पतीला जबरदस्त धक्का  (Husband shocked) बसला. मात्र त्यानंतर त्यानं पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. लग्नापूर्वी राहत होते लिव्ह-इनमध्ये लग्न करण्यापूर्वी पती आणि पत्नी हे दोघं सहा महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र तरुणीचं दुसऱ्याच तरुणावर प्रेम होतं. ही बाब तिने लिव्ह-इन पार्टनरपासून लपवून ठेवली होती. मात्र तरुणीचं आपल्यावरच प्रेम असल्याचं तरुणाला वाटत होतं. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याची चर्चादेखील केली होती. मात्र लग्न झाल्यानंतर पत्नीनं दारूच्या नशेत लग्न केल्याचं सांगितलं. पतीला पडला प्रश्न सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत, धामधुमीत लग्न होत असताना पत्नीनं त्यावेळी विरोध का केला नाही, असा प्रश्न पतीनं विचारला. त्यावर काहीच उत्तर न देता पत्नी रडू लागली. त्यानंतर मात्र पतीला तिची दया आली आणि त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करायचं ठरवलं. आपल्या पत्नीचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्याशी तिला लग्न करता यावं, यासाठी पतीने मन मोठं करत घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हे वाचा- गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार कुटुंब न्यायालयात केला दावा पतीनं कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि लग्न झाल्याच्या चौथ्या दिवशीच पत्नी माहेरी निघून गेली. मधल्या काळात कोरोनामुळे न्यायालयाचं कामकाज लांबलं आणि या घटस्फोटाला विलंब झाला. मात्र नुकताच न्यायालयानं हा घटस्फोट मान्य केला आणि पतीचा दावा स्विकारत त्यांची घटस्फोटाची मागणी मान्य केली.
First published:

Tags: Crime, Divorce, Marriage

पुढील बातम्या