खूप दिवसांनी मिळाली दारू अन् तरुणाच्या अंगात संचारला ‘शोले’तला ‘वीरू’

खूप दिवसांनी दारु मिळाल्याने तरुण भरपूर दारू प्यायला आणि पाण्याच्या टाकीवर चढून गोंधळ घातला

खूप दिवसांनी दारु मिळाल्याने तरुण भरपूर दारू प्यायला आणि पाण्याच्या टाकीवर चढून गोंधळ घातला

  • Share this:
    अलीगढ, 6 मे :  गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये दारुची दुकानं बंद होती. ते खुली झाल्यानंतर मद्यपींनी दारुच्या दुकानांबाहेर मोठी रांगच लावली. दारुची दुकानं खुली झाल्यानंतर अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच अलीगढमध्ये दारु प्यायल्यानंतर एक नाट्यमय घटना घडली आहे. खूप दिवसांनी बंद असलेली दुकानं खुली झाल्यानंतर जनपदमधील एक तरुण भरपूर दारु प्यायला. दारु प्यायल्यानंतर तो चक्क पाण्याच्या टाकीवरच चढला आणि त्याने हाय व्होल्टेज ड्रामाच सुरू केला. सांगितले जात आहे की फार दिवसांनी दारु मिळाल्यामुळे तरुण मनसोक्त दारु प्यायला आणि घरी पोहोचला. दारु प्यायल्यामुळे त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. या तरुणाचे नाव शशी असं आहे. या भांडणातून रागाच्या भरात तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो थेट पाण्याच्या टाकीवरच चढला. वर जाऊन तो स्वत:ला शोले चित्रपटातील धर्मेंद्र असल्याचे सांगू लागला. आपल्या पत्नीला बोलवा, असा हट्टही करू लागला. तरुणाचा हा ड्रामा सुरू असल्याने खाली मोठी गर्दी जमा झाली होती. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला खाली उतरवण्यासाठी ते त्याला विनंती करू लागले. मात्र तरुण ऐकण्यास तयार नव्हता. व्यसन असलेल्या या तरुणाला जेव्हा दारु मिळाली तेव्हा आनंदात त्याने अनेक बाटल्या रिचवल्या. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तो शोले चित्रपटातील वीरुच्या भूमिकेत शिरला आणि पाण्याच्या टाकीवर चढला. बराच वेळ तरुण खाली यायला तयार होत नव्हता.  तो टाकीवर चढल्यानंतर खाली मोठी गर्दी जमा झाली. सूचना मिळाल्यानंतर महापौर शकुंतला भारतीदेखील तेथे पोहोचल्या. त्यानंतर तरुणाच्या पत्नीला बोलावण्यात आले. शशी याची पत्नी आपल्या मुलांसह तेथे आली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि खाली येण्याची विनंती केली. त्यानंतर बराच काळ सुरू असलेल्या ड्रामानंतर तरुण  अखेर खाली उतरला. संबंधित-कोरोनाबाबत मोठा खुलासा करणार होता चीनचा संशोधक; गोळी मारुन केली हत्या
    First published: