मराठी बातम्या /बातम्या /देश /'प्रिय मोदीजी, आमचे दात येत नाहीयेत', चिमुकल्यांनी थेट पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र, मागितली मदत

'प्रिय मोदीजी, आमचे दात येत नाहीयेत', चिमुकल्यांनी थेट पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र, मागितली मदत

दुधाच्या बाटलीमुळे दातांचे नुकसान होऊ शकते - 
दुधाच्या बाटल्यांमुळे मुलांच्या दातांना इजा होऊ शकते. प्रत्येक आहारानंतर मातांनी बाळाच्या हिरड्या आणि दात स्वच्छ कपड्याने पुसले पाहिजेत. लक्ष न दिल्यास दातांच्या समस्या उद्भवू शकतात. मातांनी त्यांचे दूध मुलांना पाजणे हा उत्तम मार्ग आहे

दुधाच्या बाटलीमुळे दातांचे नुकसान होऊ शकते - दुधाच्या बाटल्यांमुळे मुलांच्या दातांना इजा होऊ शकते. प्रत्येक आहारानंतर मातांनी बाळाच्या हिरड्या आणि दात स्वच्छ कपड्याने पुसले पाहिजेत. लक्ष न दिल्यास दातांच्या समस्या उद्भवू शकतात. मातांनी त्यांचे दूध मुलांना पाजणे हा उत्तम मार्ग आहे

चिमुकल्यांनी आपली सर्वात मोठी समस्या पंतप्रधानांकडे मांडली आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही झालं की देवबाप्पाकडे गाऱ्हाणं मांडणाऱ्या या चिमुकल्यांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आपली समस्या मांडली आहे. ही समस्यासुद्धा अशी की जी वाचून आपल्याला हसू येतं. पण या चिमुकल्यांचा निरागसपणा, त्यांचा क्युटनेस काळजाला भिडतो. या चिमुकल्यांनी चक्क आपल्याला दात येत नाहीत (Assam kids letter about teeth), यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे (Assam Siblings Letter to PM Naendra modi).

आसाममधील दोन चिमुकल्यांचं पत्र (Assam Siblings Letter) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी आपली दातांची समस्या मांडली आहे.

6 वर्षांची रईसा रावजा अहमद आणि 5 वर्षांचा आर्यन अहमद. या दोन्ही भावंडांचे दात पडले आहेत. त्यांचे समोरील दात पडले आहेत. जे लवकर येत नाही आहेत. दात यायला वेळ लागत असल्याने त्यांना खायला त्रास होतो आहे. आवडीचे पदार्थ नीट खाता येत नाही येतत, असं त्यांनी नमूद केलं आहे.

'प्रिय मोदी जी... माझे दात येत नाही आहेत. यामुळे मला जेवण चावताना समस्या होत आहे. कृपया आवश्यक ती कारवाई करावी', असं या पत्रात म्हटलं आहे. सोबतच या पत्रावर दातांचं छोटंसं चित्रही काढण्यात आलं आहे.

हे वाचा - चिमुकली लेक खेळत होती असा खेळ; पाहून वडीलांना दरदरून फुटला घाम

या मुलांचं हे पत्र त्यांचे काका मुख्तार अहमद यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

First published:
top videos

    Tags: PM narendra modi, Viral, Viral news, Viral photo