बंगळुरू, 30 मे : कोरोनाव्हायरसला (coronavirus) रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत टप्प्याटप्याने चार लॉकडाऊन घेण्यात आले. चौथा लॉकडाऊन 31 मे रोजी संपतो आहे. आतापर्यंत तरी देशात तितक्या प्रमाणात कोरोनाव्हायरस वाढल नाही मात्र लॉकडाऊन संपला तर तो इतक्या झपाट्याने वाढेल की, डिसेंबरपर्यंत अर्धा भारत कोरोनाव्हायरसच्या विळख्यात असेल, असा दावा भारतातील तज्ज्ञांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेस च्या रिपोर्टनुसार, न्यूरोव्हायरोलॉजी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सचे (NIMHANS) प्रमुख कर्नाटकातील कोविड-19 हेल्थ टास्क फोर्सटे नोडल ऑफिसर डॉ. व्ही. रवी (Dr. V. Ravi) यांनी देशात कोरोनाव्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत चिंता व्यक्त केली आहे. डॉ. रवी यांनी सांगितलं, “आतापर्यंत देशात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली नाही. 31 मे रोजी लॉकडाऊन 4.0 संपल्यानंतर जूनपासून हा आकडा वाढेल. देशात कम्युनिटी ट्रान्समिशनही होईल. डिसेंबर अखेरपर्यंत भारतातील निम्मी लोकसंख्या कोरोनाव्हायरसने संक्रमित होईल. 90 टक्के लोकांना माहितीही नसेल की त्यांना कोरोनाव्हायरस झाला आहे. फक्त 5-10 टक्के रुग्णांना हाय फ्लो ऑक्सिजनद्वारे उपचार करावे लागतील. फक्त 5 टक्के रुग्णांना वेंटिलेटरची गरज पडेल” हे वाचा - एअर इंडियाचा पायलट निघाला कोरोना पॉझेटिव्ह, अर्ध्यातून बोलावलं विमान “लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांची ही प्रकरणं हातळण्यासाठी तयार राहायला हवं”, असंही डॉ. रवी यांनी सांगितलं आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणारी ही वाढ लक्षात घेता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या निर्देशानुसार सर्व राज्यांना प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन कोरोना टेस्टिंग लॅब असाव्यात अशा सूचना दिल्यात. 60 लॅबचं लक्ष्य गाठणारं कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे" हे वाचा - Social Distancing ठेवण्यासाठी मोबाइलची मदत; गुगलनं आणला नवा अॅप “आपल्याला मार्च 2021पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागेल. लोकांनी कोरोनाव्हायरसह जगायला शिकायलं हवं. आवश्यक ती सर्व खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करायला हवा. नवा कोरोनाव्हायरस हा एबोला, मर्स आणि सार्सप्रमाणे जीवघेणा नाही”, असंही डॉ. रवी म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.