मराठी बातम्या /बातम्या /देश /चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत (Devendra Fadnavis on Delhi tour) दाखल झाले आहेत. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्लीत अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (After Chandrakant Patil now Devendra Fadnavis reaches Delhi)

देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता की अचानक हा दौरा ठरला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. असं म्हटलं जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित काही बैठका आहेत आणि त्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले आहेत.

यासोबतच राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांचं पूर्नवसन सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांना आता विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांनाही विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाचा : नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाल्याने संघटनात्मक बदल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आता देवेद्र फडणवीस दिल्लीत कुणा-कुणाची भेट घेतात हे पहावं लागेल.

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत शाह-पाटील यांच्या भेटीची माहिती दिली आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील याबाबतची माहिती दिली होती.

"चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली", अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पण या भेटीमागे अनेक कारणं असल्याच्या शक्यता आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तयारीबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Amit Shah, Delhi, Devendra Fadnavis