मुंबई, 28 जून: निसर्गात सतत काहीना काही चमत्कार घडत असतात. हे चमत्कार पाहून आपल्याला तोंडात बोट घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आता याला तुम्ही निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही, परंतु आग्राच्या (Agra) रामबागमध्ये राहणाऱ्या एका ऑटोचालकाच्या पत्नीने एकाच वेळी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार बाळांना जन्म (Women gave birth to 4 babies) दिला आहे. विशेष म्हणजे आई आणि चारही बाळं पूर्णपणे सुरक्षित आहे. या महिलेने 3 मुली आणि 1 मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताच सर्वत्र याच घटनेची चर्चा होत आहे. एतमदौला मधील प्रकाश नगर येथील रहिवासी असलेल्या मनोज कुमारची पत्नी खुशबू हिला काही दिवसांपूर्वी आग्रा ट्रान्स यमुना कॉलनी रामबाग येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं तिनं एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिला आहे. ही प्रसूती सोपी नसली तरी डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आई आणि चारही बाळं पूर्णपणे सुरक्षित आहे. विशेष म्हणजे खुशबू आणि मनोजला आधीच तीन मुली आहेत. हेही वाचा: ना बेबी बम्प, ना प्रेग्न्सीचं लक्षण; पोटात दुखू लागलं आणि 20 वर्षांच्या तरुणीने अचानक दिला बाळाला जन्म सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांचे वडील मनोज कुमार व्यवसायाने ऑटो ड्रायव्हर असून, त्याला आता या मुलांच्या पालनपोषणाची चिंता लागलेली आहे. मनोज कुमार हे आग्रा येथे ऑटोचालक आहेत. सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यांना आधीच तीन मुली आहेत. आणि यावेळी चार मुले एकत्र जन्मालाआली आहेत. आता मात्र मनोज कुमार यांना सर्व सात मुलांच्या संगोपनाची चिंता सतावत आहे. हेही वाचा: ही कसली वागणूक? कपड्यांमुळे मुलांना रेस्टॉरंटबाहेर काढलं, Video पाहून लोकांचा संताप डॉक्टरांनी दिले सहकार्याचे आश्वासन- सध्या रूग्णालयात मुलांच्या एका दिवसाच्या उपचाराचा खर्च 6000 रुपये आहे. म्हणजेच संपूर्ण दिवसात देखभालीसाठी २४ हजार रुपये खर्च होत आहेत. मनोजकुमार यांनी उधारीचे पैसे घेऊन आतापर्यंत पैसे भरले आहेत. त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस मुलांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. मनोजला याची खूप काळजी वाटते. मात्र, मुलांच्या शिक्षणाबाबत रुग्णालयाच्या संचालकानेही मदतीचे आश्वासन दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.