मराठी बातम्या /बातम्या /देश /Kanupriya Passes Away: दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचं कोरोनानं निधन

Kanupriya Passes Away: दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचं कोरोनानं निधन

दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया (TV Anchor Kanupriya Passes Away) यांचं कोरोनानं निधन झालं आहे. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

नवी दिल्ली 01 मे : कोरोनानं (Coronavirus) संपूर्ण देशभरात हाहाकार घातला आहे. या काळात कोरोनामुळे अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही जगाचा निरोप घेतला आहे. लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांच्या निधनानंतर आता मीडिया क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया (TV Anchor Kanupriya Passes Away) यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर असण्यासोबत उत्तम अभिनेत्रीही होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगितलं होतं. सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाली होती. तसंच तापही वाढत होता. याच दरम्यान कनुप्रिया यांचं निधन झालं.

एक दिवस आधीच रोहित सरदाना यांचं निधन -

लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचंही एक दिवस आधीच निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीसाठी अँकर म्हणून काम करत होते. रोहित सरदाना यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.

First published:
top videos

    Tags: Actress, Corona patient, Coronavirus, Patient death