वसीम अहमद, प्रतिनिधी अलीगढ, 23 फेब्रुवारी : सध्या लग्नाआधीच नाते तुटण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. कधी हुंड्यासाठी तर कधी अपमानामुळे वधू-वराचे नाते सात जन्माच्या नात्यात बदलण्याआधीच तुटत आहे. यानंतर आता एक पूर्णपणे वेगळे प्रकरण समोर आले आहे. लग्नापूर्वी वधूचे काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले. यामुळे वरमुलाने लग्नाला नकार दिला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील आहे. येथे क्वार्सी भागात राहणाऱ्या तरुणीचे लग्न बुलंदशहर येथे राहणाऱ्या तरुणासोबत निश्चित झाले होते. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. गुरुवारी त्यांच्या लग्नाची वरातही काढण्यात येणार होती. मात्र, त्याच्या एक दिवस आधी मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले. हे फोटो वराच्या नातेवाईकांनाही पाठवले होते. यानंतर वरमुलाने लग्नास नकार दिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू - मुलाच्या बाजूने लग्नास नकार दिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये बोलणी सुरू आहेत. दोघेही हा प्रश्न सोडवण्याच्या कसरतीत गुंतले आहेत. मात्र, अद्याप वराच्या बाजूने लग्नासाठी संमतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. वधूचे जुने फोटो समोर आल्यानंतर त्याला हे लग्न करायचे नाही आहे. फोटो व्हायरल कसे झाले? हेही वाचा - पोलीस भरतीचे स्वप्न, Instagram वरील मित्रानेच गंडवलं, पालघरमधील महिलेची डायरेक्ट 2 लाखात विक्री लग्नाच्या एक दिवस आधी मुलीचा फोटो कसा व्हायरल झाला आणि तो वराच्या कुटुंबीयांना कसा पाठवला गेला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हे फोटो कोणी व्हायरल केले याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांत तक्रार आलेली नाही. दोन्ही पक्ष आपापल्या स्तरावर हे प्रकरण सोडविण्याच्या कसरत करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







