Home /News /national /

घरातल्या रिकाम्या खोल्यांमध्ये केली मश्रूमची शेती, सुरु झाली 3 लाखांची कमाई

घरातल्या रिकाम्या खोल्यांमध्ये केली मश्रूमची शेती, सुरु झाली 3 लाखांची कमाई

घरातील रिकाम्या खोल्यांचा उत्तम वापर करून घेत मश्रूमची शेती करून 3 लाखांचं उत्पन्न (A Woman earning lakh with mashroom farming) मिळवणाऱ्या महिलेची सध्या जोरदार चर्चा आहे.

    बिहार, 20 ऑक्टोबर : घरातील रिकाम्या खोल्यांचा उत्तम वापर करून घेत मश्रूमची शेती करून 3 लाखांचं उत्पन्न (A Woman earning lakh with mashroom farming) मिळवणाऱ्या महिलेची सध्या जोरदार चर्चा आहे. बिहारच्या (An experiment by woman got successful) गोपालगंजमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं हा अनोखा प्रयोग केला आहे. घरात एकट्याच असलेल्या या महिलेला वृत्तपत्रातून याबाबत माहिती मिळाली. तिनं घरातच प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. अशी झाली सुरुवात गोपालगंजमध्ये राहणाऱ्या रेखा देवींची मुलं मोठी होऊन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्या घरात एकट्याच राहत असत. भल्यामोठ्या घरात त्या एकट्याच असल्यामुळे घरातील बाकीच्या खोल्या रिकाम्या होत्या. या खोल्यांचा काहीच उपयोग नसल्यामुळे तिथं मश्रूमची शेती करण्याची कल्पना त्यांना सुचली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी घरात करण्याच्या शेतीच्या प्रयोगासंदर्भात वृत्तपत्रात माहिती वाचली होती. आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कऱण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घरात पिकवले मश्रूम घरात मश्रूमची लागववड करून त्याची देखभाल करायला त्यांनी सुरुवात केली. बघता बघता मश्रूम जोमात वाढले आणि बाजारात त्याला चांगली किंमतदेखील मिळाली. पहिल्यात वर्षी रेखा देवी यांना 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. त्यानंतर त्यांनी याविषयी अधिक शास्त्रोक्त ज्ञान घेत मश्रूम शेतीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मश्रूमचे इतर प्रॉडक्ट विकायलाही सुरुवात केली. त्या सध्या मश्रूमचे लाडू, मश्रूमची बिस्किटं आणि मश्रूमचं लोणचंदेखील विकतात. त्याला ग्राहकांची जोरदार मागणी आहे. हे वाचा- नारी तू लय भारी! डोळ्यावर पट्टी बांधून तलवारबाजी; VIDEO पाहून तोंडात बोटं घाला सुधारली आर्थिक स्थिती रेखा देवी यांनी सहज सुरू केलेल्या या प्रयोगाला चांगलं यश मिळालं आहे. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती कमालीची सुधारली असल्याचं त्या सांगतात. या शेतीत आपला वेळ चांगला जात असून त्यामुळे महिन्याकाठी चांगले पैसे जमा होत असल्याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Business, Farmer

    पुढील बातम्या