मराठी बातम्या /बातम्या /देश /हाहाहा! नेत्याची अजब आश्वासनं; ज्येष्ठांना बिडीचं पाकिट, नळाला दूध आणि गावात एअरपोर्ट

हाहाहा! नेत्याची अजब आश्वासनं; ज्येष्ठांना बिडीचं पाकिट, नळाला दूध आणि गावात एअरपोर्ट

सध्या एका उमेदवारांनं (Candidate) दिलेल्या अजब आश्वासनांची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे.

सध्या एका उमेदवारांनं (Candidate) दिलेल्या अजब आश्वासनांची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे.

सध्या एका उमेदवारांनं (Candidate) दिलेल्या अजब आश्वासनांची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे.

पटना, 10 सप्टेंबर : निवडणुकीत (Election) कोण कुठलं आश्वासन (Promise) देईल, याचा काही नेम नाही. सध्या एका उमेदवारांनं (Candidate) दिलेल्या अजब आश्वासनांची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे. बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) तोंडावर आल्या आहेत. त्यासाठीची रणधुमाळी रंगायला सुरुवात झाली असून उमेदवारांनी आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.

लक्षवेधी आश्वासन

एका उमेदवारानं ग्रामपंचायत निवडणुकीसाठी केलेली आश्वासनांची खैरात पाहून प्रत्येकाला जाम हसू फुटत आहे. आपण निवडून आलो, तर गावातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मोफत विडीचं बंडल देण्याची घोषणा तुफैल अहमद यांनी केली आहे. त्याशिवाय गावातील तरुणींना मोफत ब्युटी पार्लरची सुविधा आणि गावातील प्रत्येक तरुणाला अपाची बाईक देण्याचं घोषणापत्रच छापण्यात आलं आहे. त्याशिवाय आपल्याकडे गावाचं नेतृत्व आल्यानंतर गावात विमानतळ उभारण्याची घोषणादेखील त्याने केली आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

या अजब आश्वासनांची सोशल मीडियावर सध्या जोरदार खिल्ली उडवली जात आहे. नागरिकांना मतांसाठी विड्यांचं आणि ब्युटी पार्लरचं आश्वासन देण्याच्या कल्पनेचं काहीजण कौतुक करत आहेत, तर निवडणूक प्रक्रियेचं गांभीर्य अशा प्रकारांमुळे हरवत चालल्याचं काहींचं म्हणणं आहे. आप रखिए हम पर विश्वास, एक-एक का होगा विकास, अशी घोषणा अहमद यांच्या नावाने छापलेल्या आश्वासन पत्रावर आहे.

नळातून येणार दूध

आपल्याला निवडून दिलं, तर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या नळांमार्फत दूध येईल, असं आश्वासनदेखील या पत्रात देण्यात आलं आहे. तर प्रत्येकाच्या शेतात टाईल्स लावून चकाचक शहरासारखा फील आणला जाईल, हे आश्वासन तर लोकांना हसवून हसवून लोळायलाच भाग पाडत असल्याची चर्चा आहे.

हे वाचा -अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह तिघांचा सामूहिक बलात्कार; 3 दिवसानंतर सुटका

क्रूर चेष्टा

प्रत्यक्षात ही आपण दिलेली आश्वासनं नसून आपल्या नावे कुणीतरी मस्करी करत असल्याचा दावा तुफैल अहमद यांनी केला आहे. आपण यातील एकही आश्वासन दिलं नसून आपल्या नावाचा वापर करून भलत्याच कुणी ही पत्रकं छापली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Bihar, Bihar Election