मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह तिघांचा सामूहिक बलात्कार; 3 दिवसानंतर नराधमांच्या तावडीतून सुटली

अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह तिघांचा सामूहिक बलात्कार; 3 दिवसानंतर नराधमांच्या तावडीतून सुटली

हरियाणातील पलवल येथून घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर मध्यप्रदेशातील भोपाळमधील दोन हॉटेल आणि एका फ्लॅटमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना 16-17-18 ऑगस्ट रोजी टीटी नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली.

हरियाणातील पलवल येथून घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर मध्यप्रदेशातील भोपाळमधील दोन हॉटेल आणि एका फ्लॅटमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना 16-17-18 ऑगस्ट रोजी टीटी नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली.

हरियाणातील पलवल येथून घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर मध्यप्रदेशातील भोपाळमधील दोन हॉटेल आणि एका फ्लॅटमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना 16-17-18 ऑगस्ट रोजी टीटी नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली.

भोपाळ, 10 सप्टेंबर : भाजप नेता, जेडीयू नेता आणि एका पेट्रोल पंप चालकानं 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape on minor) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेत भाजपचे अनेक बडे नेते सहभागी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

हरियाणातील पलवल येथून घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर मध्यप्रदेशातील भोपाळमधील दोन हॉटेल आणि एका फ्लॅटमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना 16-17-18 ऑगस्ट रोजी टीटी नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी दिंडोरी भाजप जिल्हा कार्यालय मंत्री मनीष नायक, दिंडोरी जेडीयू जिल्हाध्यक्ष दिनेश आवाडिया आणि पेट्रोल पंप चालक अमित सोनी यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. तिघांनाही दिंडोरीतूनच अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. याआधी पोलिसांनी दोन महिला पारुल राठोड, सीमा आणि सैफ नावाच्या व्यक्तीवरही कारवाई केली होती. पीडितेने अशोका गार्डन पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी आरोपींविरोधात मानवी तस्करी, सामूहिक बलात्कार, पॉक्सोसह अनेक कलमांमध्ये गुन्हा दाखल केला.

अशा प्रकारे आरोपींचा पत्ता उलघडला

अल्पवयीन मुलाला दिंडोरीच्या आरोपींची नावे माहीत नव्हती. पोलिसांनी यासाठी हॉटेलमधून माहिती काढली. त्यानंतर कळले की, दिंडोरीचे रहिवासी मनीष नायक, दिनेश आवाडिया, अमित सोनी हे 18 ऑगस्ट रोजी हॉटेलमध्ये थांबले होते. या आधारावर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि अटक केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्षे 8 महिने आहे. ती मूळची पलवल, हरियाणातील एका गावाची आहे. 13 ऑगस्टला ती घरातून पळून मुंबईला जाण्यासाठी मथुरेला आली होती. यानंतर ती मुंबईला जाण्यासाठी इंदूरला जाणाऱ्या बसमध्ये बसली. बसमध्ये तिला पारुल राठोड नावाची मुलगी सापडली. पारुलने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला आणि तिला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने भोपाळला आणले.

पारुलने तिला तिच्या ओळखपत्राद्वारे अशोका गार्डनच्या अमन हॉटेलमध्ये राहायला लावले. यानंतर पारुलने अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले. 16 ऑगस्ट रोजी पारुल तिला अमन हॉटेलजवळील फ्लॅटमध्ये घेऊन गेली. येथे सैफ नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. पारुलने सैफकडून 1500 रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट रोजी पारुलने तिची मैत्रीण सीमाला फोन केला. यानंतर पारुल तिला टीटी नगर येथील हॉटेलमध्ये घेऊन गेली. येथे दिंडोरीच्या तीन लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलीला पुन्हा हमीदिया रोडवरील हॉटेलमध्ये नेण्यात आले. येथे दुसऱ्या एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला.

हे वाचा - मॉलमध्ये शॉपिंग करत होती महिला अन् त्यानं मागून शरीरात सोडले शुक्राणू, 10 वर्षांची शिक्षा

यानंतर पारुल पुन्हा मुलीला हॉटेलमध्ये पाठवत होती. पण मुलीने नकार दिला. 19 ऑगस्टला मुलगी कशी तरी हॉटेलमधून पळून गेली आणि अशोक गार्डन पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला.

काँग्रेसने भाजपच्या बड्या नेत्यांवर आरोप केले

या प्रकरणात काँग्रेसने भाजपवर मोठ्या नेत्यांना वाचवल्याचा आरोप केला आहे. यासोबतच मंत्री त्यांना संरक्षण देत असल्याचाही आरोप होत आहे. काँग्रेस नेते नरेंद्र सलुजा यांनी ट्विट केले की, घटनेच्या दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्षही भोपाळमध्ये होते. आरोपीसोबत त्याची अनेक चित्रे आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आरोपींना मंत्र्यांचे संरक्षण आहे. या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे की, त्या हॉटेलमध्ये किती खोल्या बुक केल्या होत्या. कोणत्या नावाने, कोणत्या तारखेला ते बुक केले गेले. हॉटेल्समध्ये कोण राहिले? हे देखील समोर येत आहे की, त्या काळात भाजपचे बरेच मोठे नेते देखील त्या हॉटेलमध्ये होते. हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले पाहिजेत.

काँग्रेसला आरोप करण्याची जुनी सवय असल्याचे भाजप नेते विश्वास सारंग यांनी म्हटले आहे. या प्रकरणात कोणीही दोषा आढळले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मध्य प्रदेशात कायद्याचे राज्य आहे. कोणाचीही चूक सहन केली जाणार नाही.

First published:
top videos

    Tags: Gang Rape, Rape news, Rape on minor