मराठी बातम्या /बातम्या /देश /सावधान ! 16 लाख किमी वेगानं येतंय एक वादळ, पुढचे दोन दिवस राहा सावध

सावधान ! 16 लाख किमी वेगानं येतंय एक वादळ, पुढचे दोन दिवस राहा सावध

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सूर्याच्या परिमंडळातून तयार झालेलं एक महाभयंकर वादळ पृथ्वीच्या दिशेनं झेपावत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या वादळाचा वेग ताशी 1609344 किलोमीटर एवढा असून ते रविवारी किंवा सोमवारी पृथ्वीवर धडकेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 जुलै : सूर्याच्या परिमंडळातून तयार झालेलं एक महाभयंकर वादळ (Storm) पृथ्वीच्या (Earth) दिशेनं झेपावत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या वादळाचा वेग ताशी 1609344 किलोमीटर एवढा असून ते रविवारी किंवा सोमवारी पृथ्वीवर धडकेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. अर्थात पृथ्वीवर पोहोचेपर्यंत या वादळाच्या वेगात फरक पडणार असला तरी अनेक यंत्रणांवर (Systems) या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

या गोष्टींवर जाणवू शकतो परिणाम

स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार सूर्याच्या परिमंडळातून या वादळाची निर्मिती झाली असून त्याचा परिणाम वेगवेगळ्या यंत्रणांवर होण्याची शक्यता आहे. रेडिओचे सिग्नल, विमानाची यंत्रणा, कम्युनिकेशनची माध्यमं आणि पाऊस या घटकांवर या वादळाचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रहांवर वादळाचा प्रकाश

उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळ असणाऱ्या प्रदेशातून जर आकाशाकडे पाहिलं, तर पृथ्वीच्या जवळ असणारे इतर ग्रह यामुळे अधिक प्रकाशमान दिसू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वातावरणातील या बदलांमुळे पुढील दोन रात्री ग्रहांचा रंग अधिक चमकदार दिसेल आणि त्यांच्याभोवती या वादळामुळे निर्माण झालेली धूळही दिसू शकेल, असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे.

हे वाचा -अमेरिकेची झोप उडाली; चिनी सैनिकांना शक्तिशाली करण्यासाठी जेनेटिक फेरफार

उकाडा वाढण्याची शक्यता

सूर्यापासून तयार झालेलं हे वादळ असल्यामुळे हे वारे अत्यंत उष्ण असतात. त्यामुळे पृथ्वीवर जेव्हा हे उष्ण वारे आदळतील, तेव्हा पृथ्वीचं तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उष्णतेचा विपरित परिणाम सॅलेटाईटवरही झाल्यामुळे आपल्या मोबाईल सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. या वाऱ्याचा वेग सध्या प्रचंड असला तरी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे या वेगाला आवर घातला जाईल, असं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: High alert, Storm