नवी दिल्ली, 23 जानेवारी: सिंघू बॉर्डरवर (Singhu border) शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmer agitation) सुरू आहे. याठिकाणी एका व्यक्तीला शूटर (shooter) असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर सादर केलं होतं. या व्यक्तीनं केलेल्या चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. हा व्यक्ती मूळचा सोनीपतचा (Sonipat) आहे. या व्यक्तीनं अशी माहिती दिली आहे की, त्याचं नाव योगेश असल्याचं सांगितलं. तो 19 जानेवारीला दिल्लीमध्ये एका नातेवाईकाकडे आला होता. रस्त्यात काही आंदोलनाकारी लोकांनी त्यांचं अपहरण केलं. रस्त्यात काही आंदोलनकर्त्यांनी अपहरण करत या व्यक्तीला अनेक दिवस खूप मारहाण केली. योगेशनं सांगितलं, की आंदोलकर्ते त्याला म्हणाले, जर तुला यातून सहीसलामत सुटायचं असेल तर आम्ही सांगू तेच माध्यमांना सांगावं लागेल. योगेश म्हणाला, की त्याच्यासोबत अजून 4 तरुणांनाही पकडलं गेलं. योगेशनं चौकशीत सांगितलं, की या आंदोलनकर्त्यांनी त्याच्यावर दबाव टाकला. हे लोक त्याला म्हणाले, की तू माध्यमांसमोर तेच बोलायचंस जे आम्ही तुला सांगू. योगेशनं हे सुद्धा सांगितलं, की त्याला अनेक दिवस कॅम्पमध्ये बांधून ठेवलं गेलं. त्यानंतर त्याला दारू पाजली गेली. यादरम्यान त्याला बरीच मारहाणसुद्धा केली गेली. त्याला सांगितलं गेलं, की तू पुढे तेच करायचं आहेस जे आम्ही तुला सांगू. (हे वाचा- Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनात शूटरला पकडले, 4 शेतकरी नेत्यांवर रचला होता गोळीबाराचा कट ) विशेष म्हणजे, या कथित शूटरनं आधी असं सांगितलं होतं, की तो 26 जानेवारीला किसान ट्रॅक्टर रॅलीमध्ये (Kisan tractor rally) गोळी चालवून रॅली विस्कळीत करण्याचा कट रचणार होता. त्यानं सांगितलं, की 23 ते 26 जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांना गोळी मारली जाणार होती. आणि त्याच्यासोबतच्या महिलांचं काम लोकांना भडकावणं हे होतं. शूटरनं कबुली दिली, की त्यानं जाट आंदोलनामध्येही वातावरण हिंसक करण्याचं काम केलं होतं. (हे वाचा- मध्यरात्री चेक करीत होता ईमेल; INBOX मध्ये जे पाहिलं त्यामुळे झोपूच शकला नाही ) आंदोलनकारी शेतकरी शस्त्र घेऊन रॅलीत जाणार आहेत की नाही याची माहिती काढण्यासाठी दोन टीम्सना तैनात केलं गेलं आहे. त्यानं सांगितलं, की 26 तारखेला किसान नेते (Farmer leaders) मंचावर बसलेले असताना त्यांना गोळी मारण्याचा आदेश त्याला मिळाला होता. शूटरला चार लोकांचे फोटोजही दिले गेले होते. शूटरनं सांगितलं, की तो 19 जानेवारीपासून सिंघू बॉर्डरवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.