मराठी बातम्या /बातम्या /देश /एका महिन्याच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे जीडीपीचं 1 ते 2 टक्क्यांनी होणार नुकसान, नवा अंदाज समोर

एका महिन्याच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे जीडीपीचं 1 ते 2 टक्क्यांनी होणार नुकसान, नवा अंदाज समोर

'या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सकल घरेलू उत्पादनामध्ये (GDP)अपेक्षित असलेली 3 टक्के वृद्धी होणं कठीण आहे.'

'या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सकल घरेलू उत्पादनामध्ये (GDP)अपेक्षित असलेली 3 टक्के वृद्धी होणं कठीण आहे.'

'या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सकल घरेलू उत्पादनामध्ये (GDP)अपेक्षित असलेली 3 टक्के वृद्धी होणं कठीण आहे.'

  नवी दिल्ली, 18 एप्रिल : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे देशाचा जीडीपी मोठ्या प्रमाणात घसरला होता. त्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सावरत असताना कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. याचाच परिणाम म्हणून 2020-21 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सकल घरेलू उत्पादनामध्ये (GDP)अपेक्षित असलेली 3 टक्के वृद्धी होणं कठीण आहे, असं वॉल स्ट्रिटची ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ अमेरिका(बोफा) सिक्युरीटीजने म्हटलं आहे. बोफाने (BofA Securities)दिलेल्या अहवालानुसार कोरोनामुळे अर्थव्यवस्था पुन्हा जोमाने उभारी घेऊ शकणार नाही. ब्रोकरेज कंपनीने सांगितलंय की एका महिन्याच्या राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊनमुळे जीडीपीमध्ये एक ते दोन टक्के घसरण होईल.

  बोफाच्या अहवालात असं सांगितलंय, की सध्या वाढ अगदीच धीम्या गतीने होत आहे. तसंच, महत्त्वाचे आर्थिक निर्देशक कोसळले आहेत. पतवाढही अगदीच कमी प्रमाणात होत आहे. कोरोना संक्रमणाचे (Covid Cases) आकडे वाढत असल्यामुळे वाढीच्या आघाडीवर चिंता वाढली आहे. सात घटकांवर आधारित असणारा बोफा इंडियाचा क्रियाशीलता निर्देशांक(Acitvity Index)फेब्रुवारीमध्ये घसरून अवघ्या एक टक्क्यावर आला. जानेवारीमध्ये हा निर्देशांक 1.3 टक्क्यांवर होता. जानेवारी आणि फेब्रुवारीची तुलना केली असता लक्षात येतं, की फेब्रुवारीत भारताच्या निर्देशांकांशी निगडित सात घटकांपैकी चार घटक जानेवारीच्या तुलनेत अगदीच मंदावले आहेत.

  यापूर्वी मार्चच्या तिमाहीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणं अपेक्षित होतं. मात्र आता हे सगळे अंदाज फोल ठरताना दिसून येत आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षाचा आढावा घेतल्यास लक्षात येईल, की या निर्देशांकात 2020 च्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच वाढ झाल्याचे दिसून आले. त्यापूर्वी तब्बल नऊ महिने या निर्देशांकामध्ये घटच होत होती. बोफाच्या या अहवालात असंही म्हटलंय, की कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यामध्ये पुन्हा वाढ होईल अशी अपेक्षा ठेवणं जोखमीचं आहे. तर ब्रोकरेज कंपनीच्या अनुमानानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात एक महिना लॉकडाऊन लागू केल्यामुळे जीडीपीचे सुमारे एक ते दोन टक्क्यांचे नुकसान होईल.

  कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही पुन्हा पूर्ण देश लॉकडाउन करणं शक्य नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्पष्ट केलं आहे. पण लोक बिनधास्तपणे रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी भटकत असल्याने पुन्हा लॉकडाउन करावा का याबद्दल सरकार नक्कीच विचार करत असेल. त्यावेळी या अहवालातील मत सरकार विचारातही घेईल.

  First published:

  Tags: Coronavirus, Gdp, Lockdown