उत्तराखंड, 07 फेब्रुवारी : उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेक लोकं बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे.
#BreakingNews #Exclusive
— News18 Hindi (@HindiNews18) February 7, 2021
उत्तराखंड के जोशीमठ में ग्लेशियर टूटने से तबाही, ऋषिगंगा पर बना डैम पूरी तरह से टूटा. NDRF ने जारी किया एलर्टी.#Uttrakhand #Chamoli #Joshimath @PrashantChurhe pic.twitter.com/BJgF7Fq2hK
हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नदीला महापूर आला आहे, पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे छोटे-मोठे बंधारे हे फुटले आहे. खबरदारी म्हणून किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोकं आणि घरं वाहून गेली आहे,अशी माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.