सूरत 28 मार्च : अनेक लोक जमीन विकत घेत असतात. त्यामुळे, जमीन विकत घेणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, एका हौशी व्यक्तीनं थेट चंद्रावरच (Land On the Moon) जमीन विकत घेतली आहे. चंद्राचं नेहमीच प्रत्येकाला आकर्षण राहिलं आहे. कवीच्या कविता, शायरची शायरी किंवा मग वैज्ञानिकांचे वेगवेगळे दावे, अशा अनेक गोष्टींमुळे माणसांना चंद्राबद्दल प्रचंड कुतूहल आहे. अंतरिक्ष एजन्सी तर चंद्रावर मानवी वस्ती विकसित करण्याचा विचारही करत आहे. याच कारणामुळे चंद्रावर जमीन विकत घेण्यास काहींनी सुरुवातही केली आहे. अशात आता गुजरातच्या सूरतमधील एका व्यापाऱ्यानी आपल्या दोन महिन्याच्या मुलासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. सूरतचे व्यापारी विजयभाई कथीरिया यांनी आपल्या दोन महिन्याच्या मुलाचं नाव नित्या ठेवलं आहे. नुकतंच त्यांनी त्याच्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला. यावर त्यांना 13 मार्चला अॅप्रूवल मिळालं. यानंतर त्यांनी आपले सर्व गरजेचे कागदपत्रही तिथे पाठवले. त्यांच्या कुटुंबाला मुलाच्या नावाच्या कंपनीचं एक प्रमाणपत्रही मिळालं आहे. त्यांना चंद्राच्या दुसर्या बाजूला जमीन दिली गेली आहे. त्या ठिकाणचे नाव मेर मॉस्कोव्हियन्स आहे. त्याला सी ऑफ मस्कॉवी देखील म्हणतात. जमीन खरेदीच्या किंमतीचा अहवालात खुलासा केला गेला नाही. मात्र, याची किंमत (Price of Land on Moon) 750 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 54 हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. चंद्रावर जमीन घेणारे विजयभाई सूरतचे पहिले व्यापारी ठरले आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा चंद्रावर जमीन खरेदी करतो तेव्हा त्याला एक प्रमाणपत्रही दिलं जातं. याला अत्यंत मोलाचं गिफ्ट समजलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.