मराठी बातम्या /बातम्या /देश /

ना भपका, ना बडेजाव! फक्त 500 रुपयांत झालं लग्न; कोरोनाकाळात मेजर आणि मॅजिस्ट्रेटचा अनोखा आदर्श

ना भपका, ना बडेजाव! फक्त 500 रुपयांत झालं लग्न; कोरोनाकाळात मेजर आणि मॅजिस्ट्रेटचा अनोखा आदर्श

बँड, बाजा किंवा इतर कुठलाही बडेजाव न करता एका सिटी मॅजिस्ट्रेटचं सैन्यातील मेजरसोबत लग्न झालं. हार आणि मिठाई यांच्या खरेदीसह केवळ 500 रुपयांत हा लग्नसोहळा पार पडला.

  • Published by:  desk news

भोपाळ, 13 जुलै: एखाद्या राजकीय नेत्यांचं (Politician) किंवा बड्या सरकारी अधिकाऱ्याचं (Bureaucrat) लग्न आणि बडेजाव हे भारतीय समाजातलं सूत्र दोन बड्या अधिकाऱ्यांनी मोडून काढलं आहे. बँड, बाजा किंवा इतर कुठलाही बडेजाव न करता एका सिटी मॅजिस्ट्रेटचं (City magistrate) सैन्यातील मेजरसोबत (Army Major) लग्न झालं. हार आणि मिठाई यांच्या खरेदीसह केवळ 500 रुपयांत (Rs. 500) हा लग्नसोहळा पार पडला.

असा घेतला निर्णय

भोपाळमधील सिटी मॅजिस्ट्रेट शिवांगी जोशी यांचा विवाह आर्मीमध्ये मेजर पदावर कार्यरत असणाऱ्या अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी ठरला होता. दोन वर्षांपूर्वीच दोघांच्या घरच्यांच्या संमतीनं हे लग्न निश्चित झालं. मात्र काही ना काही कारणामुळं हे लग्न पुढं ढकललं जात होतं. त्यात कोरोना संकटामुळे लग्न कसं करायचं, हा देखील प्रश्न होताच. अखेर या शिवांगी आणि मेजर अनिकेत यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला आणि नोंदणी पद्धतीनं विवाह करण्याचा निर्णय़ घेतला.

घरच्यांनाही केलं तयार

कोरोना काळात गर्दी जमवणं अयोग्य असून केवळ मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा हा निर्णय दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यांची सहमती मिळवली. त्यानंतर केवळ फुलांचे दोन हार आणि मिठाईचे दोन पुडे एवढीच ‘शॉपिंग’ करत दोघं विवाहबंधनात अडकले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर दोघंही कोर्टात गेले आणि तिथं आपल्या लग्नाची नोंदणी केली.

हे वाचा -मित्राला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; हायप्रोफाईल सेक्स रॅकेटच्या एजंटला अटक

ठेवला नवा आदर्श

या दोघांनीही साध्या पद्धतीनं विवाह करून समाजापुढं एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. कोरोना काळात विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर सरकारनं बंधनं घातली आहेत. तरीही अनेकजण ही बधनं झुगारून मोठमोठे विवाहसोहळे करताना दिसतात. या दोघांनी मात्र आपल्या कृतीतून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

First published:

Tags: Bhopal News, Madhya pradesh, Marriage