मेरठ, 18 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात भयंकर सिलेंडर स्फोट झाला. या स्फोटामुळे बरेच लोक जखमी झाले आहेत. स्फोटाबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक लोकांनी पोलिसांना जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे इमारत कोसळली. इमारत कोसळल्यामुळे सात जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी एसएसपी अजय सहानी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
वाचा-समुद्रावर पर्यटकांची गर्दी असतानाच कोसळली दरड, थरारक LIVE VIDEO आला समोर
Meerut: A building collapses following a cylinder blast in Falawada area of the district. "Seven people were rescued from the debris and rushed to a hospital. Two of them have succumbed to injuries. An inquiry will be done in this matter," says SSP Ajay Sahani. (17.11.2020) pic.twitter.com/yBIWTGsEoj
— ANI UP (@ANINewsUP) November 17, 2020
वाचा-दोन ट्रॉली भरून उसासह ट्रॅक्टर भीमा नदीपात्रात कोसळला, चालक जागीच ठार
दरम्यान, याआधी 29 ऑक्टोबरलाही अशीच एक घटना घडली होली. एका घरात गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला होता. यात घरं कोसळली होती. घर कोसळल्याने आणि ढिगाऱ्याखाली गुदमरून कॉंग्रेसचे शहराध्यक्षांसह दोन जणांचा मृत्यू. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच सरधना पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.